कारण

Gold rate today : बजेटच्या आधीच सोनं, चांदी महागलं, मात्र ग्राहकांना मोठा फायदा…

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2021 चा अर्थसंकल्प (Budget 2021) संसदेत सादर करत आहेत. या वार्षिक अर्थ संकल्पनांवर संपूर्ण देशासह आंतरराष्ट्रीय बिग बजेट कंपन्यांचं लक्ष भारताच्या अर्थसंकल्पावर असणार आहे. (Gold rate today: Gold and silver became more expensive before the budget, but consumers benefited greatly)

हे एकीकडे सुरू असताना बजेटआधीच सोने-चांदीच्या किंमतींमध्ये (Gold Silver rate) वाढ झाली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दरामध्ये 274 रुपयांची वाढ झाली आहे. आजचा सोन्याचा दर 49 हजार 370 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.(gold and silver price are gains)

आजच्या चांदीच्या दरांबद्दल बोलायचं झाल्यास फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच चांदीच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे,चांदीच्या दरात 1 हजार 944 रुपयांनी वाढ होऊन तो दर अजच्या दिवसासाठी 73 हजार 873 रुपये प्रतिकिलोवर थांबला आहे.

बजेटनंतर सोन्याच्या किंमती पडणार?
देशाच्या बजेटमध्ये सोने आणि चांदी यांच्यासाठी काय सोय केली आहे, याकडे ग्राहक आणि सोन्याचे व्यापारी यांचे लक्ष लागून आहे. तर बजेटनंतर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता असल्याचं आणि सोन्यावरील इम्पोर्ट ड्युटी कमी होण्याची शक्यता एंजल ब्रोकिंगचे उपाध्यक्ष अनुज गुप्ता यांनी वर्तवली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments