आपलं शहर

मुंबईत कोरोना रुग्णांचा वाढता आलेख; रुग्णांचा आकडा हजार पार…

राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस पुन्हा वाढतच चाललाय. आज दिवसभरात तब्बल 8 हजार 807 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल 80 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांनी गेल्या कित्तेक दिवसांनंतर हजाराचा टप्पा ओलांडलाय. त्यामुळे मुंबईतही कोरोना वाढत चालल्याचं दिसतं आहे.

मुंबईत आज तब्बल 1167 रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ सुरूच असून कोविड रुग्णवाढीचा दर 0.24 इतका झाला असून. रुग्ण बरे होण्याचा दर हा 94 टक्के इतका झाला आहे. तर रुग्ण दुपटीचा दर खाली घसरला असून 294 दिवसांवर आला आहे.

मुंबईतील 51 इमारती आणि झोपडपट्या कंटेंटमेन्ट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रीय सीलबंद इमारतींची संख्या 815 इतकी आहे. मुंबईत काल मृत झालेल्या रुग्णांपैकी 3 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. यातील मृत झालेले रुग्ण सर्व पुरुष होते. यातील 4 मृत झालेले व्यती 60 वर्षावरील होते.

1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार असल्याचं माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकरांनी दिली आहे.

(Growing graph of corona patients in Mumbai; The number of patients has crossed one thousand …)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments