कारण

त्यांना आधी शिवरायांसमोर चप्पल काढायला शिकवा’, चंद्रकांत पाटलांना टोला

सध्या झालेल्या एल्गार परिषदेमधील शरजील उस्मानीची क्लिप मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही तापण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे अनेक बडे नेते थेट शिवसेनेच्या हिंदुत्वावर सवाल उठवत आहेत, तर त्या सर्वांना उत्तर देताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा समाचार घेतला आहे. (Shiv Sena leader Gulabrao Patil Coment on BJP leader Chandrakant Patil’s latter)

शरजील उस्मानी (Sharjeel Osmani) हा उत्तर प्रदेशमधील अलिगड मुस्लिम विद्यापीठात शिक्षण घेत आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल उत्तर प्रदेशमध्येही त्याच्यावर कारवाई व्हावी, याप्रकारचे पत्र चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister of Uttar Pradesh Yogi Adityanath) यांना पाठवले आहे.

पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, अशापद्धतीने हिंदुविरोधी वक्तव्य जर कोणी करत असेल, तर त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल, अशा शब्दात गुलाबराव पाटलांनी विरोधकांना टोला लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे कारवाईची मागणी करण्यापेक्षा त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना पायातील चप्पल काढण्यास शिकवावे, असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांना पाठवलेलं पत्र

Chandrakant Patil letter min

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments