कारण

Budget 2021 highlights : देशाच्या बजेटमध्ये कोणासाठी काय? संपूर्ण वर्षात या गोष्टींना मिळणार निधी

Union Budget 2021-22 highlight : देशातील मध्यमवर्गीयांपासून बड्या उद्योजकांपर्यंत सर्वांचे लक्ष बजेट 2021 कडे (Budget 2021-22) आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण  (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी हे बजेट नव्या ढंगात सादर केले आहे. (Budget 2021: Highlights of the country’s economic budget)

कोरोना, घसरलेली अर्थव्यवस्था, विकासदर, बेरोजगारी अशा समस्या सोबत घेऊन केंद्र सरकार पुढील आर्थिक वर्ष नेमकं कुठल्या पद्धतीने नियोजन करणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडू, केरळ आणि बंगाल या राज्यांमध्ये केंद्र सरकारने विशेष भर दिला आहे.

शेती (Budget for agriculture)

2021-22 च्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट MSP (Minimum Support Price – न्यूनतम समर्थन मूल्य)   देण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. 2021 मध्ये गहू उत्पादक शेतकऱ्यांना 75 हजार कोटी रुपये देण्याची तसेच शेतकऱ्यांकडून मोठ्याप्रमाणात धान्य खरेदी करणार असल्याचीही घोषणा सरकारने केली आहे.

बँकांचे खासगीकरण (Privatization of banks)

IDBI सह देशातील अन्य सोन बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे. बजेट सादर करताना  निर्मला सीतारमण यांनी ही मोठी घोषणा केली आहे. तसेच एका विमा कंपनीचेही खासगीकरण करण्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

वीज क्षेत्रासाठी मोठी तरतूद (Budget for power sector)
देशातील वीज वितरण क्षेत्रासाठी 3,05, 984 कोटींची तरतूद अर्थ संकल्पात करण्यात आली आहे. यासाठी नव्या योजनेला सुरुवातही करण्यात आली आहे. हायड्रोजन एनर्जी मिशन, ग्रीन पॉवरच्या माध्यमातून हायड्रोजनची निर्मिती, असे प्रकल्प येत्या आर्थिक वर्षात करण्यात येणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

विमा क्षेत्र
अर्थसंकल्पात विमा क्षेत्राचा लेखाजोगा मांडण्यात आला आहे. विमा क्षेत्रातील FDI (foreign direct investment- थेट परकीय गुंतवणूक) 49 टक्क्यांहून वाढून 74 टक्के करण्यात आल्याची माहिती अर्थमंत्रांनी दिली आहे.

कोरोनानंतर BPCL, AIR India, SCI, IDBI सह इतर बड्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यावर केंद्राने सावधानीची भूमिका घेतली आहे. कायद्यामध्ये बदल करून LIC चे आयपीओमध्ये रूपांतर करणार असल्याची घोषणा सितारमण यांनी केली आहे.

रेल्वे (Budget for railways)

रेल्वे मंत्रालयासाठी 1 लाख 10 हजार 055 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भविष्यात रेल्वेसाठी राष्ट्रीय रेल योजना तयार करण्याचे नियोजन असल्याचं अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

आत्मनिर्भर भारत (Atmanirbhar Bharat)
सध्या भारताची अर्थ व्यवस्था 5 ट्रिलीयन डॉलरने वाढवण्याचे लक्ष केंद्र सरकारचे आहे. त्यासाठी अर्थव्यवस्थेत अडीच पटीने वाढ गरचेजी आहे, म्हणून सरकार 13 क्षेत्रांची निवड करून त्यात येत्या 5 वर्षात सरकार 1 लाख 9 कोटी रुपये खर्च करणार असून यामुळे देशातील रोजगार वाढणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

व्हॅक्सिनसाठी 35 हजार कोटी (Corona Budget)

सध्या कोव्हिड लसीसाठी 35 हजार कोटी तर पुढील 3 वर्षांसाठी आणखी 5 लाख कोटी राखीव ठेवले जाणार असल्याची घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली आहे.

सध्या देशात 2 कोरोना लसी उपलब्ध असून त्यांचा लाभ फक्त भारतीयांनाच नव्हे तर  तर शेकडो देशांनाही होणार असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे. मोदींकडून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेला सुरुवात करण्यात आली आहे, त्यातून 80 कोटी गरिबांना मोफत अन्न सोबत अनेक सुविधा मिळणार असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषित केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments