आपलं शहर

Petrol-Diesel price: पेट्रोलने गाठली शंभरी

मुंबई – देशात इंधनच्या दरात कपात होताना दिसत नाही. सलग नवव्या दिवशी देशात इंधन दरात वाढ झाली आहे.दिल्लीमध्ये इंधनच्या दरात 25 पैशांनी वाढ झाली आहे. एक लिटर पेट्रोलची किंमत 89.54 रुपयांवर तर एक लिटर डिझेलची किंमत 79.95 रुपयांवर पोहचली आहे.

राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलने शंभरी गाठली आहे.एक लिटर पेट्रोलची किंमत 100.07 इतकी झाली आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये पेट्रोलची प्रति लिटर किंमत 96 रूपये इतकी आहे आणि डिझेलचे दर 86.97 रुपयांवर पोहोचले आहे. बाकीच्या शहरांमध्येही इंधन दरात झपाट्याने वाढ होत आहे.

या सगळ्यावर मुंबईकरांनी नाराजी वर्तवली आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर परवडत नसल्याने गाड्या बाहेर काढायच्या की नाही असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. पेट्रोलचे दर वाढल्याने अनेक दुचाकीस्वारांमध्ये अशांतता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल पंपावरची गर्दी कमी झाल्याचे चित्रही निर्माण झाले आहे. (Increase in petrol and diesel prices in Mumbai)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments