खूप काही

या विद्यापीठाच्या चक्क 37 हजार डिग्री बोगस, 17 राज्यातील विद्यार्थ्यांचं करिअर बरबाद

हिमाचल प्रदेशच्या सोलनमध्ये मानव विद्यापीठात हिमाचल पोलिसांनी खूप मोठा घोटाळा पकडला आहे. या घोटाळ्याने 17 राज्यात हाहाकार माजवला आहे. हा खोट्या डिग्रीचा घोटाळा 194 करोड 17 लाख रुपयांचा असल्याचं सांगितलं जातंय.

या घोाळ्याप्रकरणी एसआयटीच्या टीमने 75 जागी छापेमारी केली आणि 275 लोकांची चौकशी केली. विद्यापीठाने जारी केलेल्या एकूण 41,000 पदवींपैकी आतापर्यंत केवळ 5000 डिग्री खऱ्या असल्याचे आढळले आहे.

घोटाळ्याचे मुख्य आरोपी आणि मानव भारती ट्रस्टचे चेअरमन राजकुमार राणा यांना अटक केली आहे. या घोटाळ्यात 17 राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. 

एसआयटीने दिलेल्या माहितीनुसार हा घोटाळा अजून मोठा असू शकतो. मानव भारती विद्यालयामध्ये हा घोटाळा कसा झाला, त्याचे मूळ शोधण्याच काम आता एसआयटी करत आहे.

पोलीस महासंचालक (डीजीपी) संजय कुंडू यांनी शिमला येथे माध्यमांना संबोधित करताना सांगितले की हिमाचल प्रदेशातील शैक्षणिक संस्थांचा समावेश असलेला हा पहिला आर्थिक घोटाळा होता. ते म्हणाले की पोलीस, ईडी आणि आयकर अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या एसआयटीच्या तपासणीदरम्यान राणा आणि त्याच्या कुटुंबीयांनी या रॅकेटमधून 387 कोटींची मालमत्ता हडप केल्याचे उघडकीस आले आहे. डीजीपी पुढे म्हणाले की, आता आमचा शोध विद्यापीठाची स्थापना कशी झाली यावर सुरू आहे, ते म्हणाले की राणा हरियाणाच्या करनालचा रहिवासी असून त्याने 2009 मध्ये बनावट पदवी रॅकेट सुरू केले.

80 टक्केपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची पदवी खोटी

विद्यालयाच्या 41 हजारपैकी 80% विद्यार्थ्यांची पदवी खोटी असल्याचे समोर आले आहे. मानव भारती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजकुमार राणा यांनी या बनावट डिग्री व्यवसायामुळे अवघ्या 11 वर्षात 440 कोटींचे साम्राज्य निर्माण केले. हिमाचलचा हा सगळयात मोठा घोटाळा करणारे राजकुमार राणा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments