खूप काही

नोकरी बदलण्यात महिन्याच अंतर असल्यास काय होईल ? जाणून घेण्यासाठी पहा

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनंतर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच ईपीएफ बद्दल बरीच चर्चा आहे.ईपीएफमध्ये गुंतवणूक केल्यामुळे कलम 80 सी अंतर्गत कर कपातीचा फायदा होतो. जर पैसे काढले तर ते पूर्णपणे करमुक्त होऊ शकतात पण त्यावर एक अट आहे.ईपीएफवरील व्याज दर 8.5 टक्के असून, व्याज उत्पन्न पूर्णपणे करमुक.

जर सलग 5 वर्षे काम केले तर या सेवानिवृत्ती निधीतून पैसे काढण्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही. या काळात जर नोकरी बदलली तर करात सवलत मिळू शकते. पण 2 नोकऱ्यांमध्ये अंतर असू नये.जुन्या मालकाचा भविष्य निर्वाह निधी नव्या कंपनीकडे नियोक्ताकडे वर्ग करावा लागेल हे देखील लक्षात ठेवले पाहिजे. यासह योगदान आपल्या पीएफ खात्यात सुरूच राहील आणि त्याची गणना एकत्र केली जाईल.

सेवेची 5 वर्षे पूर्ण नाही केली आणि त्याआधी निधीतून पैसे काढले तर कर आकारला जाईल.50 हजारांपेक्षा कमी रक्कम काढण्यासाठी टीडीएस कपात केली जाणार नाही, पण आपल्या उत्पन्नामध्ये त्याजा समावेश केला जाईल, आणि आपण ज्या टॅक्स मध्ये येतो त्या नुसार कर भरावा लागेल.जर आपण 5 वर्षे सेवा संपल्यानंतर पैसे काढल्यास ते पूर्णपणे करमुक्त आहे. जर कंपनी पाच वर्षांपूर्वी बंद झाल्यास योगदानाची प्रक्रिया बिघडते, अशा परिस्थितीत 5 वर्षांपूर्वी पैसे काढण्यासाठी कोणताही कर वजा केला जाणार नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments