कारण

हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा गर्व; राज्यसभेतील भाषणात गुलाम नबी आजाद भावुक

राज्यसभेतील काँग्रेस खासदार गुलाम नबी आजाद यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. त्यांच्या सन्मानार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक खासदारांनी गुलाम नबी आजाद यांच्या समारोपाचं भाषण केलं.

यानंतर गुलाम नबी आजाद यांची बोलण्याची वेळ आली, तेव्हा ते भावुक झाले. ते म्हणाले, ‘मी त्या नशीबवान लोकांमध्ये आहे, जे पाकिस्तानमध्ये कधी गेले नाहीत. पण जेव्हा मला कळतं की पाकिस्तानात काय अवस्था आहे, तेव्हा मला अभिमान वाटतो की आम्ही भारतीय मुस्लिम आहोत. जगात जर कुठल्या मुस्लिम नागरिकाने अभिमान बाळगला पाहिजे तर तो भारतीय मुस्लिमांनी मानायला हवा’, अशा शब्दात आझाद यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

गुलाब नबी आजाद म्हणाले की, मी जम्मू-काश्मीरातील सर्वात मोठ्या एसपी कॉलेजातून शिकलो. येथे 14 ऑगस्ट (पाकिस्तानचा स्वातंत्र दिन) देखील साजरा करीत होतो आणि 15 ऑगस्टदेखील. तेथे 14 ऑगस्ट साजरा करणाऱ्यांची संख्या जास्त होती. आणि जे लोक 15 ऑगस्ट साजरा करीत होते, त्यात मी आणि माझे मित्र होते. आम्ही प्रिंसिपल आणि स्टाफसोबत राहत होतो. मात्र यानंतर आम्ही 10 दिवस शाळेत जात नव्हतो, कारण आम्हाला यानंतर मार खावा लागत होता. मात्र मी त्यातून बाहेर पडलो आहे. मला आनंद आहे की, जम्मू – काश्मीरच्या अनेक पक्षांच्या नेतृत्वात जम्मू-काश्मीरचा विकास झाला.

सेच ‘मला नेहमीच असे वाटते की मी भाग्यवान आहे. कारण मी जन्नत म्हणजे हिंदुस्तानात राहतो. माझा जन्म स्वातंत्र्य झाल्यानंतर झाला. मात्र जेव्हा यूट्यूबवर तेव्हाची परिस्थिती पाहतो किंवा पुस्तकात तो काळ वाचतो तेव्हा असे वाटते की मी पाकिस्तानला गेलो नाही हे चांगलेच होते. जेव्हा पाकिस्तानमधील परिस्थिती पाहतो, तेव्हा मला मी हिंदुस्तानी मुसलमान असल्याचा गर्व होतो. आज जगातील कोणत्या मुसलमानाने अभिमान बाळगायला हवा तर तो हिंदुस्तानातील मुसलमानाला असायला हवा’, असेही त्यांनी सांगितले.

(i feel proud to be a hindustani muslim – Gulab Nabi Azad)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments