कारणखूप काही

जण-सामान्यांच्या खिशाला कात्री आणि जीवाला चटका लागणार, 25 रुपयांनी सिलिंडर महागणार

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर झाला आणि सर्वसामान्यांचे अर्थचक्र मेटाकुटीला आले. जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढल्याने सर्व सामान्यांनी या महागाईला सामोरं कस जायच असा प्रश्न आता उभा राहिला आहे.

त्यातच आता दैनंदिन वापरात अत्यावश्यक अशा सिलिंडर चा दर ही 25 रुपयांनी वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसात क्रूड ऑइल ची किंमत 59 डॉलर प्रति बॅरल झाली असून सौदी अरेबियाने तेलाचे उत्पादन कमी केल्याचे हे परिणाम असल्याचे सांगतले जात आहे.

पेट्रोल डिझेल च्या दारात 35 पैशाने वाढ झालेली आहे. तर 14 किलो वजनाच्या सिलिंडरच्या दारात 25 रुपयाने वाढ करण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.या गोष्टीचे परिणाम इतर क्षेत्रांवर ही होणार यात काही वाद नाही. सिलिंडर महागल्याने खरंच खिशाला कात्री आणि जीवाला चटका लागण्याची वेळ सर्व सामान्यांवर आली आहे.

आजचे दर:
सिलिंडर :710 रुपये
पेट्रोल :93.20 रुपये
डिझेल: 83.67 रुपये

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments