खूप काही

भारताच्या या वेगवान गोलंदाजाने घेतली क्रिकेट विश्वातून निवृत्ती

भारताचा वेगवान गोलंदाज विनय कुमारने आज क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने एका ट्विटच्या माध्यमातून आपली निवृत्ती जाहीर केली. विनय कुमारने भारतासाठी 31 एकदिवसीय, 9 टी-20 आणि 1 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच त्याने या सर्व प्रकारात 49 बळी देखील घेतलेले आहेत.

“आज दावणगेरे एक्सप्रेस 25 वर्षे आणि क्रिकेट कार्कीदीत अनेक स्टेशन्स मागे टाकत आता अखेरीस निवृत्ती या स्टेशनवरती थांबत आहे. संमिश्र भावनांसह मी, विनय कुमार आंतराष्ट्रीय आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. हा निर्णय अजिबातच सोपा नव्हता. परंतु, प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात हा दिवस येतोच.” अशी भावना विनय कुमारने आपल्या पत्रात व्यक्त केली आहे.

विनय कुमारची कारकिर्द

विनय कुमारने 2004-05 साली रणजी ट्रॉफी मध्ये कर्नाटककडून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली. विनयने 139 प्रथम श्रेणी सामने खेळले. ज्यामध्ये त्याने 504 बळी घेतले. विनयला आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाली नाही मात्र स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने आपली जादू दाखवली. विनयने 2013-14 आणि 2014-15 अशी दोन वर्षे कर्नाटक रणजी संघाचे कर्णधारपद भूषविले आहे. या दोन्ही वर्षी कर्नाटकने रणजी करंडकावर आपले नाव कोरले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments