कारण

Pooja Chavan : पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याची चौकशी, गृहमंत्र्यांची मोठी माहिती

सध्या महाराष्ट्रात एकच प्रकरण मोठ्याने गाजत आहे, इतकेच नाही तर विरोधात असलेल्या भाजपनेदेखील एकच प्रकरण सर्वार्थाने लावून धरलं आहे,  ते म्हणजे पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाणबद्दल. (Pooja Chavhan: Inquiry into senior Shiv Sena leader in Pooja Chavan case, big information of Home Minister)

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर शिवसेना नेते, सध्याचे वनमंत्री आणि बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे एकमेव नेते म्हणून ओळख असलेल्या संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. याच विधानावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही स्पष्टीकरण दिल आहे.

या प्रकरणात समोर आलेल्या प्रत्येक ऑडीओ क्लिपची शहानिशा केली जाणार आहे, सोबतच नाव चर्चेत असल्याने मंत्री संजय राठोड यांची नियमानुसार चौकशीदेखील केली जाणार असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.  भाजपच्या नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमध्ये काहीही तथ्य नसून या प्रकरणाची संपूर्ण चौकशी पुणे पोलीस योग्यरित्या करत असल्याची माहिती देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पुणे पोलिसांवर कुणाचाही दबाव नाही, विरोधी पक्षाच्या आरोपात तथ्य नाही, पुणे पोलीस चांगली चौकशी करत आहेत, चौकशी रिपोर्ट आल्यानंतर, सत्य निष्पन्न होईल, चौकशी झाल्यावर वस्तूस्थिती समोर येईल, नियमानुसार कारवाई होणार असल्याचे स्पष्टीकरणही अनिल देशमुख यांनी दिले आहे. (Pooja Chavhan: Inquiry into senior Shiv Sena leader in Pooja Chavan case, big information of Home Minister)

सेलिब्रिटींच्या ट्विटचं काय?
सेलिब्रिटींच्या ट्विटबाबत माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. मी म्हणालो, भाजपच्या आयटी सेलची चौकशी करु; पण माझ्या तोंडी लता मंगेशकर, तेंडुलकर यांची चौकशी करणार अशा बातम्या आल्या. लता मंगेशकर दैवत, सचिन तेंडुलकरला संपूर्ण देश मानतो, माझा आदेश भाजपच्या आयटी सेलची चौकशी करण्याचा होता, असं विधानही अनिल देशमुख यांनी केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments