कारण

Budget 2021 : ATM मधून पैसे काढण्यापासून ते ऑनलाइन जेवण मागवण्यापर्यंत आजपासून होणार हे 8 बदल

Union Budget 2021 : 1 फेब्रुवारी 2021 पासून होणार आहेत काही नियमांत बदल. परंतु या बदलणाऱ्या नियमांचा सरळ परिणाम होणार आहे आपल्या पगारावर. आज वित्त मंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थ संकल्प सादर केला. जाणून घेऊयात आजपासून नवीन होणाऱ्या बदलांबद्दल.  (Introducing new 8 rules of Budget 2021)

2021 चं बजेट
आज 2021-22 चे बजेट सादर झाले. हे बजेट पेपर लेस असून डिजिटलपध्दतीने सादर झालं. डिजिटल बजेट आपल्याला आपल्या फोने मधून पाहता येईल, फोनमध्ये Union budget mobile App डाउनलोड करून आपण ही सर्व माहिती मिळवू शकतो.

ट्रेनमध्ये मागवू शकतो जेवण :

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सरकारने रेल्वे बंद केली होती, परंतु आजपासून सर्व सामान्यासाठी ही सुविधा परत सुरु होणार आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून रेल्वे मधील कॅटरिंगची सुविधा बंद करण्यात आली होती, परंतु ही सेवादेखील आजपासून सुरु होणार आहे.

ATM मधून नाही काढू शकणार रक्कम :

PNB च्या नव्या नियमानुसार 1 फेब्रुवारीपासून खातेधारकांना नॉन इएमव्ही ATM मधून पैसे काढता येणार नाही. बँकेने घेतलेला हा निर्णय ATM च्या माध्यमातून होणाऱ्या फसवणुकी रोखण्यासाठी घेण्यात आलेला हा निर्णय आहे.

इएमव्ही ATM म्हणजे ज्यात आपण कार्ड स्वाईप करून पैसे काढू शकतो. तसेच बँक या ATM ना प्रोत्साहन देत आहे.

सामान्य नागरिकांनासाठी सुरु होणार मुंबई लोकल ट्रेन :

सकाळी 7:00 पर्यंत दुपारी 12:00 वाजेपासून ते 4:00 वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्री9:00 वाजल्यापासून ते ट्रेन सेवा संपेपर्यंत मुंबईतील लोकल सेवा चालू राहणार आहे. तसेच इतर वेळेस म्हणजेच सकाळी 7:00पासून ते12:00 पर्यंत आणि सायंकाळी 4:00पासून ते रात्री 9:00पर्यंत ट्रेन फक्त आवश्यक सेवांमध्ये असणाऱ्या लोकांसाठीच चालू राहणार आहेत.

100% क्षमतेने सुरु होणार सिनेमा गृह :

आजपासून देशभरात सर्व सिनेमा गृह 100% क्षमतेने सुरु करण्यात येणार आहेत. मार्च महिन्यात बंद करण्यात आलेले सिनेमा गृह आजपासून पुन्हा खुले होणार आहेत, ही सिनेमा प्रेमींसाठी पर्वणीच असणार आहे.

गॅस आणि सिलेंडरच्या किमती बदलणार :

या महिन्यातही दरमहिन्याप्रमाणे गॅस आणि सिलेंडरच्या किमतीत बदल होणार आहेत.

राशन कार्डशी जोडला जाणार मोबाइल नंबर :

आजपासून तेलंगणा राज्यात राशन कार्ड धारकांना मोबाइल ओ टी पी आणि आईरीस ऑथेंटिकेशनच्या मदतीने राशन मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपला मोबाइलला नंबर राशन कार्डशी लिंक करून घेणं बंधनकारक असणार आहे.

स्पाईसजेटच्या 20 नव्या फेऱ्या :

स्पाईसजेटने नवीन 20 डोमेस्टिक फ्लाईट सुरु करण्याची घोषणा केंद्राकडून केली आहे. यातील 16 उड्डाण जयपूरला देशाच्या बाकी भागांशी जोडणार असून बाकी चार कोलकाता – पकयोंग मार्गावर आणि दिल्ली डेहराडून मार्गावर असतील.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments