खूप काही

2021 मधील IPL चे सामने होणार या 6 शहरांमध्ये, तर अंतिम सामन्यासाठी मैदान ठरलं..

आयपीएल 2021कधी सुरू होईल याची अधिकृत माहिती अजून आली नाही. परंतु असा अंदाज बांधला जात आहे की ही स्पर्धा 11 एप्रिलपासून सुरू होऊन 6 जूनपर्यंत संपवली जाईल.

आयपीएल 2021 ही 6 शहरांमध्ये होईल. ही बातमी स्पष्ट झाली आहे. यापूर्वी केवळ 5 शहरांची यादी केली गेली होती कारण मुंबईचे आयोजन करण्याबाबत संशय होता. पण आता तेथील स्थानिक सरकारची परवानगी मिळाल्यानंतर मुंबईचा दावा देखील पक्का झाला आहे. आता दिल्ली,अहमदाबाद, चेन्नई, बेंगळुरू आणि कोलकाता यांच्यासह मुंबईतही आयपीएल सामने होणार आहेत.

मात्र, मुंबईतील ही स्पर्धा दुसऱ्या शहरांपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आयोजित केली जाईल. मुंबईत देखील इतर शहरांप्रमाणेच स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थितीही दिसून येणार नाही. आयपीएल सामने हे भारत आणि इंग्लंड यांच्यात पुण्यातील रिकाम्या स्टेडियमवर खेळल्या जाणार्‍या वन-डे सारखेच असतील. मुंबईशिवाय इतर शहरांमध्येही नाही पण 50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश घेतल जाऊ शकतो.

आयपीएल 2021 चे वेळापत्रक अजून जाहीर झाले नाही, पण आयपीएल 2021 च्या सुरूवातिची अजून कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही. परंतु असा अंदाज वर्तविला जात आहे की ही स्पर्धा 11 एप्रिलपासून सुरू होईल आणि 6 जूनपर्यंत चालविन्यात येईल . मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रॉडकास्टर्सनी बीसीसीआयला स्पर्धेचे वेळापत्रक महिनाभरापूर्वी जाहीर करावे, असे आवाहन केले आहे. जेणेकरून ते आपली तयारी करू शकतील.

आयपीएल 2021 साठी, कार्यक्रमाचे स्वरूप बदलणार नाही. टीम्स घरातील 7 आणि घराबाहेरील 7 सामने स्टेडियम खेळतील. स्पर्धेदरम्यान, संघ बायो बबलमध्ये असतील पण खेळाडू एकजूट किंवा स्वतंत्र राहतील, याबाबतची कोणतीही माहिती स्पष्ट झालेले नाही. आयपीएल २०२१ साठी मुंबई शॉर्टलिस्टेड झाल्यानंतर असे मानले जाते की तेथे प्लेऑफ सामनाही आयोजित केला जाऊ शकतो. तर या स्पर्धेचा अंतिम वा शेवटचा सामना हा अहमदाबाद मध्ये खेळला जाऊ शकतो .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments