कारण

BMC Budget 2021 : निवडणुकीच्या तोंडावर BMC च्या बजेटचं घमासान, कोणाच्या पारड्यात किती दान?

मुंबई महापालिकेचा सन 2021-22 चा अर्थसंकल्प पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल (iqbal singh chahal) आज (3 फेब्रुवारी रोजी) स्थायी समितीसमोर सादर करणार आहेत. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पापेक्षा 2021-22 चा अर्थसंकल्प 8 ते 10 टक्क्यांनी वाढणार असल्याची माहितीही आता समोर येत आहे. (Iqbal Singh Chahal will present the BMC budget today, which will also consider the upcoming elections)

बजेटमध्ये भांडवली खर्चात वाढ अपेक्षित धरण्यात आली आहे. अर्थसंकल्पात मुंबईकरांवर कोणताही नवीन कर लावण्यात येणार नसला तरी अर्थसंकल्प मांडल्यावर काही महिन्यानंतर मुंबईकरांवर मालमत्ता करवाढीचा बोजा पडणार आहे.

मुंबई महापालिकेने 2019-20 साठी 30,692 कोटी रुपयांचा तर सन 2020-21 साठी 33,441 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. 2019-20  पेक्षा 2020-21 च्या अर्थसंकल्पात 8.95 टक्क्यांची वाढ झाली होती.

मुंबईमधील कोरोनाच्या प्रर्श्वभूमीवर सन 2021-22 चा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, सोबतच कोस्टल रोड प्रकल्पासाठीही मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नोव्हेंबरमध्ये मंजूर केलेल्या मुंबईतील मनोरी येथील डिसीलटिंग प्लांटसाठी अर्थसंकल्पात निधीचे वाटप होईल.

वर्षभरात मुंबई पालिकेतील निवडणुका आल्या आहेत. येती निवडूक भाजप स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तर मनसेनेही येत्या निवडणुकीत शिवसेनेला दणका देण्याचं ठरवलं आहे, त्यामुळे निवडणुकीत आणि बीएमसीमध्ये आपली सत्ता कायम टिकवून ठेवण्यासाठी शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहणे गरजेचे असेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments