खूप काही

PCOS: ‘ती’ अडकतेय, फक्त महिलांना होणाऱ्या या आजाराची सुरुवात नेमकी कशी होते?

वंटास मुंबईच्या प्रिय वाचकांनो आजचा हा विषय थोडा वेगळा असणार आहे. कारण हा विषय खास करून ‘तीचा’ असणार आहे. (It’s PCOS and you must know about it!   what is PCOS? PCOS’ symptoms, natural treatment for PCOS, how to manage PCOS etc.)

PCOS हा प्रकार आजकाल खूप स्त्रियांच्या आयुष्याचा भाग बनला आहे. परंतु याबद्दलचे कमी ज्ञान असल्याने आणि बरोबर मार्गदर्शन न मिळाल्याने याच्यावर मात कारण थोडं अवघड झालंय. परंतु हा लेख वाचून तुमच्या बऱ्याच प्रश्नांचं निरसन होईल हे मात्र नक्की. 

    कारण हा विषय खास करून ‘तीचा’ असणार आहे  ‘ती’ जी आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप महत्वाची असते ‘ती’ कदाचित तुम्ही स्वतः ही असू शकता, तुमची पत्नी किंवा ‘ती’ तुमची मुलगी ही असू शकते, किंवा तुमची बहीण किंवा मैत्रीण सुद्धा त्यामुळे हा लेख वाचा तुमच्या ‘तीच्यासाठी’. 

पॉलीसिस्टिक ओवॅरियन सिन्ड्रोम (PCOS) आजकाल बऱ्याच महिला, मुली यांमध्ये ही समस्या दिसून आली आहे. ही समस्या बाहेरून गंभीर वाटत नसली तरीही शरीराच्या आत याचे खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतात. 

वयाच्या १४ वर्षा पासून ते ६० वर्षांपर्यंत च्या महिलांना ही समस्या उदभवू शकते. यावर कोणताही कायम स्वरूपी उपचार अजूनही आपल्याकडे नाही आहे. परंतु ही समस्या आपण कंट्रोल मध्ये नक्कीच ठेवू शकतो. तर चला सविस्तर जाणून घेऊयात PCOS बद्दल.  

काय आहे PCOS ? :  PCOS हा एक आजार आहे जो फक्त महिलांना होतो. यामध्ये स्त्रियांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात. आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या हॉर्मोन्सच्या बदलामुळे ओवरी मध्ये सिस्ट म्हणजेच गाठी निर्माण होतात. यामुळे स्त्रियांच्या मासिक पाळी किंवा प्रेग्नन्सी मध्ये समस्या निर्माण होतात. 

कशामुळे होतो PCOS ? :  आपली साध्याची जीवनशैली फार बदलली आहे. खाण्या-पिण्याच्या सवयी, कमी झोप, कामचा ताण, या कारणांमुळे ही समस्या होऊ शकते.  बाहेरच आणि चुकीचं खाण उदा. पिझ्झा , बर्गर, कोल्ड ड्रिंक्स, किंवा मद्य सेवन यामुळे ही समस्या वाढताना दिसत आहे. 

PCOS ची लक्षण कोणती ? :  PCOS च सर्वात सामान्य लक्षण म्हणजे ओवरी मध्ये सिस्ट निर्माण होणं ज्याचे मानसिक आणि शारीरिक परिणाम दिसून येतात. 

 शारीरिक परिणाम: 

1 वजन वाढणे 

2 चेहऱ्यावर मुरूम येणे 

3 खूप घाम येणे 

4 मासिकपाळी उशिराने येणे. 

5 केस गळने 

6 चव बदलत राहणे 

7 चेहऱ्यावरील केस वाढणे ( हॉर्मोन्स च्या बदलामुळे )

 मानसिक परिणाम :

1 चिडचिड होणे 

2 मूड सविंग्स 

3 तणाव 

4 गोड खावंसं वाटणे 

PCOS वर उपाय :   PCOS वर कायम स्वरूपी उपाय नसला तरीही आपण याला कंट्रोल मध्ये ठेवू शकतो.  डॉक्टर्स होरोमोन्स आणि बर्थ कंट्रोल गोळ्या देतात पण या वर एक मात्र जालीम उपाय म्हणजे वजन आटोक्यात ठेवणं.याने ओवरी मधले सिस्ट कमी होऊन निघून जातील आणि मासिकपाळी ही वेळेवर येईल ज्याने बाकीच्या सर्व समस्याही हळू हळू कमी होतील.  त्यामुळे पुरेसा व्यायाम योग, पौष्टीक आहार आणि पुरेशी झोप या काही सोप्या गोष्टीनी आपण PCOS कंट्रोल मध्ये ठेवू शकतो. 

वाचकांनो PCOS गंभीर असला त्याच्यामुळे जीवनशैली पूर्णपणे बदलत जरी असली तरीही त्याला घाबरायची अजिबात गरज नाही आहे. थोडासा सय्यम , काळजी आणि डॉक्टर च योग्य मार्गदर्शन घेऊन यावर मात करता येऊ शकते. तर तुमच्याही आयुष्यात अशी कोणतीही ती असेल तर तीची काळजी घ्या हा लेख तिच्या पर्यंत पोहचवा आणि समाजात या बद्दल जागरूकता पसरवा. 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments