खूप काहीफेमस

Jeff Bezos to step down : गॅरेज ते करोडोंची कंपनी, तरीही फेडू शकले नाहीत आईचे उपकार

जेफ बेजोस यांनी Amazon च्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून राजीनामा देऊन कार्यकारी अधिकारी बनणार असल्याचं जाहीर केले आहे. त्यांची जागा अँडी जेसी घेणार आहेत. जेफ बेजोस हे या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कार्यकारी अधिकारी या पदाचा पदभार स्विकारतील.

बेजोसच्या जागी अमेझॉन वेब सिरीजचे मुख्य अँडी जेसी हे काम सांभाळणार आहेत. बेजोस आता बोर्डच्या कार्यकारी अध्यक्ष पदावरच काम सांभाळतील. बेजोस यांनी Amezonbookseller.com ही इंटरनेट कंपनी 27 वर्षांआधी सुरु केली होती, जी आता जगतील सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. जेसीने ही कंपनी 1997 मध्ये जॉईन केली.

जेफ बेजोस एका इंटरव्ह्यूमध्ये बोलले होते की मी माझी नोकरी हा विचार करून सोडली होती की मी जेव्हा 80 वर्षांचा होईल, तेव्हा मला रिटायर होण्याचा पश्चात्ताप नसेल. 3 कॉम्प्युटरसोबत ऑनलाईन विक्रीची सूरवात झाली होती. 

3 लाख डॉलरची मोठी बोली सुरुवातील त्यांच्या आई – वडिलांनी लावली होती. कंपनीच्या स्थापनेच्या वेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना पहिला प्रश्न हा विचारला होता की इंटरनेट काय असत? 

त्यावर त्यांची आई म्हणाली की आपण इंटरनेटवर नाही बेझोसवर पैसे लावले आहेत. बेजोसने त्यांच्या आई – वडिलांना सांगितलं होत की 70% खात्री आहे की तुम्ही लावलेला पैसा बुडेल, तरीपण त्यांनी बेजोसवर विश्वास ठेवला होता. 

वर्ष 2007 मध्ये अमेझॉनने वळण घेतलं जेव्हा त्यांनी किंडल नावाचे ई-बुक बाजारामध्ये आणले, ज्याच्यामुळे अनेकजण ऑनलाईन पुस्तके डाऊनलोड करून वाचू लागले. यामुळे कंपनीने खूप प्रॉफिट कमावलं. गेल्यावर्षी ब्लूम्बर्ग बिलिनेयर इंडैक्सचच्या रिपोर्टच्या नुसार अमेझॉन फौंडरडरकडे 155 डॉलरचे उत्पन्न होते, त्यामुळे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असलेली व्यक्ती आपल्या पदाचा राजीनामा देत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments