खूप काही

Budget 2021: बजेट च्या दिवशी विमानाने प्रवास करणाऱ्यांना बसला दणका, इतका महाग झाला जेट फ्युल.

इंडियन ऑईल (IOC) च्यानुसार 1 फेब्रुवारीला राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एविएशन टरबाइन फ्यूलची किंमत 1,304.25 रूपये प्रति किलोमीटर वाढून 53,795.41 रूपये प्रति किलोमीटर इतकी झाली आहे. आज म्हणजे 1 फेब्रुवारी 2021 रोजी निर्मला सितारमण यांनी देशाचे आर्थिक बजेट सादर केलं.

बजेटयेण्याच्या आधी विमान प्रवाशांना दणका बसला आहे. ऑईल मार्केटिंग कंपनी (OMC’s) यांनी 1 फेब्रुवारी 2021 ला जेट फ्यूएलया एविएशन टरबाइन फ्यूल (ATF) च्या किमतीत वाढ केली आहे. सरकारी तेल कंपनी इंडियन ऑइलच्या वेबसाईट नुसार 1 फेब्रुवारीला राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये एविएशन टरबाइन फ्यूलची किंमत 1,304.25 रूपये प्रति किलोमीटर वाढून 53,795.41 रूपये प्रति किलोमीटर इतकी झाली आहे.

विमानाच्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे येत्या काही दिवसांत हवाई प्रवास महाग होऊ शकेल. एटीएफमध्ये वाढ असूनही, विमानातील तेल देशातील पेट्रोल-डिझेलपेक्षा स्वस्त आहे.

विमान प्रवास महागणार

ATFचे भाव वाढल्यामुळे विमान प्रवासाला दणका बसला आहे. विमान तिकीटसोबत कार्गोचे भावही वाढणार आहेत, त्यामुळे प्रवाशांचे भाडे अधिक वाढेल आणि याचा परिणाम विमान प्रवाशांच्या संख्येत होईल.

कोरोना महामारीचा फटका सगळ्यात ज्यास्त एविएशन सेक्टरवर पडेल. देशभरात विमान उड्डाण चालू आहे, पण आंतरराष्ट्रीय बंद आहेत, त्यामुळेही या दरांवर फरक पडणार आहे.

पेट्रोल- डिझेलपेक्षा स्वस्त आहे विमानाचं तेल

फेब्रुवारीला दिल्लीत पेट्रोलची किंमत 86.30 रुपये प्रतिलीटर आणि डिझेलची किंमत 76.48 रुपये प्रतिलीटर आहे. त्या तुलनेत एटीएफची किंमत 53,795.41 रुपये प्रति किलोलीटर आहे, जी 153.79 रुपये आहे. म्हणजेच विमानाच्या तेलाच्या तुलनेत कार-बाईकचे पेट्रोल-डिझेल महाग आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments