खूप काही

विश्वासातच विश्व सामावलं आहे; चिमुकल्या तीराच्या लढ्याला संपूर्ण विश्वाची साथ

‘देव तरी त्याला कोण मारी’ असं म्हणतात ते काही खोट नाही. कारण एक अशक्य वाटणारी गोष्ट शक्य होताना दिसत आहे. तीरा कामत ही पाच महिन्यांची चिमुकली स्पायनल मस्क्युलर अट्रॉफी या दुर्धर आजाराशी लढत आहे. या आजाराच्या  उपचारासाठी 16 कोटी रुपयांची गरज लागणार होती कारण हा आजार बरा करण्यासाठी लागणार औषध तब्बल 16 कोटी रुपयांचं आहे. (very inspirational story of 5 months old baby girl Teera. who is fighting with rare SMA disease.) 

तीराच्या उपचारांसाठी आधीच खूप खर्च झाला असताना मध्यम वर्गीय कुटुंबाने इतकी मोठी रक्कम कशी काय उभी करायची हा प्रश्न तीराच्या आई वडिलांना पडला होता. परंतु त्यांनी आणि आपल्या चिमुकल्या तीराने हार मानली नव्हती. तीरा तिच्या आजाराशी आणि तिचे आई वडील आर्थिक परिस्थितीशी झुंझ देत होते, त्यांनी सोशल मीडिया द्वारे लवकर आत लवकर पैसे उभे करण्यासाठी मदतीची मागणी केली. त्यानंतर अनेक लोकांनी ज्यांच्या त्यांच्या परीने पैश्यांची मदत केली. आणि बघता बघता तब्बल 16 कोटी रुपये अल्पावधीतच जमा झाले. 

परंतु अजूनही लढाई संपली नव्हती, कारण तीराच्या उपचारांसाठी लागणार ‘झोलजेन्समा’ हे औषध अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी 6.5 कोटी रुपयांचा कस्टम कर आणि जीएसटी कराचा खर्च होणार होता.म्हणून तीराच्या पालकांनी सरकारला कर माफ करण्याची विनंती केली. कराच्या रक्कमे मुळे सर्व वाटा पुन्हा अंधुक झाल्या सारख्या वाटू लागल्या होत्या. 

पण आता पर्यंत जणू संपूर्ण विश्वच तीराच्या मदतीला धावून आलं होत ते शेवटच्या क्षणी तरी साथ कसे सोडेल?  तीराची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदींना समजताच त्यांनी तातडीने 16 कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ केले. तसेच या औषधावर आकारण्यात येणार सीमा शुल्कही राज्य सरकारने आधीच माफ केला. 

खरंच अशाच प्रसंगांतून जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे हे कळून येत.आपण फक्त हार न मानता लढत राहायचं मार्ग आपोआप सापडेल कारण विश्वास सच्चा असेल तर संपूर्ण विश्व मदतीला येत आणि चमत्कार होतात. 

तीरा आणि तिचे कुटुंबीय लवकरच या कठीण परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडतील आणि ही घटना माणुसकीच उत्तम उदहारण बनेल हा विश्वास आपण ठेउयात. तसेच तीरा ला तिच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊयात. 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments