कारण

अखेर BMCसमोर कंगना नमली; कोर्टात केलेली ‘ही’ याचिका मागे घेत BMCला करणार विनंती

नेहमीच वादाच्या चौकटीत असणाऱ्या कंगणा रनौतने (Kangana Ranaut) पहिल्यांदा मुंबई महापालिका युद्धात माघार घेतली आहे. कंगनाच्या खारमधील इमारतीतील 3 फ्लॅट्स अवैधरित्या एकत्र केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेने (BMC) तिच्याविरोधात कारवाई केली होती. ((Illegal Merger Of Flats) यावर कंगणाने कोर्टात धाव घेत दाखल केलेली याचिका अखेर मागे घेतली आहे.

BMCला खुन्नस देत ‘जो उखडणा है उखाड लो’ अस शब्द कंगणाने वापरले होते. कंगनाच्या खार येथील एका इमारतीतील 3 फ्लॅट खरेदी करून त्याचं ऑफिसमध्ये रूपांतर केल्या प्रकरणी मुंबई महापालिकेने तिच्या खारमधील ऑफिसवर बुलडोझर फिरवला होता. कंगनानं खार येथील तीन फ्लॅट खरेदी केले होते आणि ते तीन फ्लॅट एकत्र करत इमारतीच्या प्लानमधील मुख्य स्ट्रक्चरमध्ये बदल केल्याचं पालिकचं म्हणणं होत. यासंबंधी पालिकेनं कंगनाला नोटीस बजावली होती. या नोटिशीविरोधात तिनं हायकोर्टात धाव घेतली होती.

आता सदर प्रकरणी कंगणाने स्वतः दाखल केलेली याचिका स्वतःच मागे घेतली आहे. शिवाय, मुंबई महानगरपालिकेकडे बांधकाम नियमित करुन घेण्यासाठी अर्ज करणार असल्याची माहिती कंगनानं वकिलामार्फत मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. यावर कोर्टात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी कंगना रनौत हिला मुभा देत, कंगनाने अर्ज केल्यास पालिकेने त्या तारखेपासून चार आठवड्यांत योग्य तो निर्णय द्यावा आणि निर्णय विरोधात असल्यास पालिकेने त्या अनुषंगाने कार्यवाही 2 आठवड्यांपर्यंत करू नये, असे आदेश हायकोर्टानं दिले आहेत.

कोरोना लॉकडाऊन मध्ये कंगना अनेक वादांची शिकार बनली. यात सध्या कंगणाच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालावी अशी एक याचिका अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या दरम्यान, कंगना रनौत हिच्या ट्विटर तसेच पालिकेच्या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती ऍड. देशमुख यांनी केली आहे. या मागणीवर माननीय न्यायालयाने 9 मार्चला सुनावणी ठेवली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments