फेमस

कंगनाने घेतला हृतिक सोबत नवा पंगा… बोलली, ‘माय सिली एक्स” !

कंगना रनौत आजकाल तिच्या वादग्रस्त ट्विट्स मुळे चर्चेचा विषय बनत चालली आहे. तिची वादग्रस्त विधान, बोचऱ्या कंमेंट्स, आणि तिरसट प्रतिउत्तर यांमुळे कंगनाचे वेगळेच रूप लोकांना पाहायला मिळत आहे. आताही कंगनाने असच एक खोडसाळ ट्विट केलय अभिनेता ह्रितिक रोशन बद्दल .

कंगना ने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक ट्विट पोस्ट केलय ज्यात तिने ‘जग कुठून कुठे पोहोचालं तरीही माझा सिली एक्स बॉयफ्रेंड अजूनही तिथेच आहे, त्याच वळणावर तिथे वेळ पुन्हा जाणार नाही’, असे म्हंटले आहे. तिच्या याच ट्विटमुळे कंगना आणि ह्रितिक यांच्या रिलेशन चा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

कंगनाच्या या पोस्टच कारण म्हणजे ह्रितिकला क्राईम ब्रांच कडून जवाब देण्यासाठी बोलवण्यात आले होते.
त्याच झालं असं की, २०१६ ला कोणीतरी ह्रितिक च्या अकाऊंटवरून कंगनाला खोटे ई-मेल पाठवले होते याच बद्दल चौकशीव्हावी यासाठी ह्रितिकने केस दाखल केली होती. इतक्या वर्षांनंतर सुद्धा ह्रितिक या गोष्टीचा पाठपुरवठा करतोय हे पाहून कंगनाने हे तिरसाळ ट्विट केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments