फेमस

कपिलचा तो ऐतिहासिक सामना लवकरच भेटीला, अंगावर शहारे येतील…

कोरोना महामारीमुळे देशातील सर्व व्यवहार बंद होते. लॉकडाऊनचा फटका जवळपास सर्वच उद्योगांना बसला आणि त्यातच सिनेमा क्षेत्राचा देखील समावेश आहे. लॉकडाऊनमुळे सर्व सिनेमागृह केंद्राच्या आदेशानुसार बंद करण्यात आली होती. मात्र आता हळूहळू परिस्थ्तिी सावरते आहे आणि अशातच केंद्राने मध्यंतरी 50 टक्के क्षमतेसह सिनेमागृह उघडण्यास परवानगी दिली होती. आता मात्र केंद्राने सर्व सिनेमागृहांना 100 टक्के क्षमतेसह उघडण्यास परवानगी दिली आहे. (Kapil’s historic match will come soon)

केंद्र सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार आता सिनेमागृह 100 टक्के क्षमतेसह उघडण्यास करायला सुरूवात झाली आहे. या निर्णयामुळे ज्या मोठ्या फिल्ममेकर्सचे बिग बजेट सिनेमे लॉकडाऊनमुळे रिलीज होऊ शकले नाहीत त्यांनी आता सिनेमागृहातच आपले सिनेमे रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे.

कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये मार्च महिन्यानंतर एकही सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. अशातच केंद्राच्या या निर्णयामुळे अनेक नव्या आणि लॉकडाऊनमुळे रखडलेल्या सिनेमांच्या प्रदशर्नाच्या तारखा जाहीर केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या “सूर्यवंशी” या रोहित शेट्टी दिग्दर्शित सिनेमाची प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती आणि अशातच अभिनेता रणवीर सिंहचा बहुप्रतिक्षीत सिनेमा “83” या सिनेमाची रिलीज डेट आता समोर आली आहे.

एका वेबसाईटच्या माहितीनुसार या सिनेमाचे मेकर्स हा चित्रपट यावर्षीच्या जून महिन्यात रिलीज करू शकतात. मागे म्हटल्याप्रमाणे सूर्यवंशी हा सिनेमा 2 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान 12 एप्रिल पासून रमजान सुरू होत आहे त्यामुळे 83 हा सिनेमा या महिन्यात रिलीज नाही करता येणार. अशातच मे महिन्यात दोन मोठे सिनेमे राधे आणि सत्यमेव जयते २ रिलीज होणार आहेत. त्यामुळे मे महिन्यातदेखील हा सिनेमा रिलीज करता येणार नाही. म्हणूणंच हा सिनेमा जून महिन्यात प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. हाती आलेल्या माहितीनुसार 25 जून रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.


दरम्यान, हा सिनेमा कबीर खान यांनी दिग्दर्शित केला आहे. हा सिनेमा 1983 मध्ये भारताने जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकप वर आधारित आहे. या सिनेमामध्ये रणवीर सिंह हा भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर अभिनेत्री दिपिका पादुकोण कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. त्याशिवाय सिनेमात अनेक सुप्रसिद्ध कलाकारांची टीम पाहायला मिळणार आहे.


Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments