फेमस

तैमुर झाला मोठा भाऊ, आई करिनाने दिला दुसऱ्या पुत्राला जन्म

चर्चित बॉलीवूडची अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) ही तीच्या दुसऱ्या प्रेग्नेंसी बद्दल चर्चेत होती. अखेर तिने आपल्या दुसऱ्या बाळाला जन्म दिला असून पुन्हा करिनाला पुत्ररत्न झाले आहे. नवरा सैफ अली खान यांच्या घरात पुन्हा एकदा छोट्या पुत्राचे आगमन झालेले आहे. याआधी 2014 मध्ये अभिनेता सैफ अली खान याने अभिनेत्री करीना कपूर हिच्याशी दुसरा विवाह केला होता. (Kareena Kapoor became a mother once again)

यातून 2016 मध्ये यांनी आता मीडियाच्या नजरेत असणाऱ्या तैमुर (Taimur) या गोड बालकास जन्म दिला होता. आता कोरोना संकटाच्या काळात लॉकडाऊन मध्ये करीना पुन्हा एकदा गर्भवती राहिल्याची बातमी दिली होती. यातच आज (21 फेब्रुवारी) अभिनेत्री करीना हिने पुन्हा एकदा बेबी बॉय ला जन्म दिला आहे. त्यामुळे सर्वस्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

गेल्या 4 ते 5 दिवसांपासून करीना कधीही बाळाला जन्म देऊ शकते अश्या पोस्ट व्हायरल होत होत्या. गर्भवती असताना देखील करीना ही सर्वाधिक ऍक्टिव्ह असणारी अभिनेत्री होती. त्यामुळे लाईमलाईट पासून ती कधीच दूर राहिली नाही. शनिवारी (20 फेब्रुवारी) अचानक करीनाला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी करीना कपूरची प्रसुती झाली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments