आपलं शहरखूप काही

Covid-19: पक्ष वाढवूया, कोरोना नको मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्ह व्हिडिओ कॉन्फन्सद्वारे जनतेशी संवाद साधला. राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे प्रशासनाने काही नियम जारी केले आहेत. तसच अनेक ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे.

लॉकडाऊन बद्दल बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाही प्रेमळ सल्ला दिला.ते म्हणाले की “मी सर्वच राजकीय पक्षांना विनंती करतो की आपणच आपल्या पासून सुरुवात करू. शासकीय कार्यक्रम झूम साच्या पद्धतीनं सुरू करूयात. सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक मिरवणुका, मोर्चे, खूप गर्दी करणारे आंदोलनं आणि यात्रा या सगळ्या गोष्टींना राज्यात बंदी घालूया.कृपा करून याची नोंद घ्यावी आणि नियमांचे पाळण करावे.” अस मुख्यमंत्री म्हणाले.

तसच त्यांनी ” तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे, बरोबर आहे सगळ्यांनाच पक्ष वाढवायचा आहे. मला पण पक्ष वाढवायचा आहे. सहकारी मित्रांना पक्ष वाढवायचा आहे, विरोधकांना पक्ष वाढवायचा आहे पण आपण पक्ष वाढवूया, कोरोना नको वाढवूया. आपण या युद्धात एकत्र राहिलं पाहिजे जर एकत्र राहिलो नाही तर पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन करायला लागेल”, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिला.

 

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments