blog

साहित्यकार ‘सावरकर’ : जो आचमनी एक क्षणी तुज प्याला…

स्वातंत्र्यवीर सावरकर या नावाने प्रसिद्ध असलेले आपले विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्या सावरकर नावा प्रमाणेच स्वतंत्र आणि वेगळ्या विचारांचे सावरकर आपण सगळे ओळखतो त्यांच्या बद्दल जास्त काही माहित नसले तरीही त्यांच्या कविता ‘जयोस्तुते’, ‘ सागरा प्राण तळमळला’ या तर नक्कीच माहित असणार. ते ही नाही तर त्यांना झालेली काळ्यापाण्याची शिक्षा या बद्दल तर नक्कीच आपण शाळेच्या पुस्तकातून शिकलो आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या कार्यात त्यांचा मोलाचा वाट होताच पण सोबतच ते उत्कृष्ट साहित्यिक सुद्धा होते. कवि, कादंबरीकार, नाटककार, लघुकथाकार म्हणून सुद्धा सावरकर प्रसिद्ध होते. सावरकरांएवढं प्रचंड लेखन करणारा लेखक मराठी भाषेत पुन्हा होणे नाही. 

स्वातंत्र्यवीर सावकरांना फक्त क्रांतिकार म्हणणं बरोबर नाही त्यांनी त्यांच्या लेखणीतून जण माणसात एक वेगळीच स्वतंत्रतेची ज्वाला पेटवली होती जी आजही त्यांच्या साहित्यातून धगधगत आहे. आजही त्यांची कोणतीही कविता कोणतही पुस्तक वाचल तरीही त्या वेदना स्वतःच्या असल्या प्रमाणे भासतात.

वयाच्या चौदाव्या वर्षी  “देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी मरता मरता मरेतो झुंझेन!” अशी शपथ घेतली आणि जीवनाच्या अखेर पर्यंत निभावली. मानवी जीवनात एकही असा विषय नाही ज्यावर सावरकरांनी लिहले नाही. सावरकरांना जेव्हा अंदमानच्या काळकोठडीत ठेवले, त्यांचे हरप्रकारे छळ केले. कधी खड्या बेडीत टांगले, तर कधी तेलाच्या घाण्याला जुंपले तरीही त्यांचे मातृभूमीवरचे प्रेम तिळभरही कमी झाले नाही. बाभळीच्या काट्याने, कोळशाने अंदमानच्या तुरुंगाच्या भिंतींवर त्यांनी काव्य लिहिली. 

सावरकरांचे साहित्य : तसे सावरकांचे साहित्य अफाट होते. सावरकरांनी 10,000 पेक्षा जास्त पाने मराठीत लिहिली तर 1500 हुन जास्त पाने इंग्रजीत लिहिली. त्यातील काहींचा उल्लेख.  

1 सावरकरांनी त्यांचे पहिले काव्य ‘फटका’ वयाच्या अकराव्या वर्षी लिहिले. 

2 सावरकरांनी 1857 चा स्वातंत्र्य समर हा ग्रंथ लिहिला ज्यात त्यांनी हा उठाव नसून एक स्वातंत्र्य संग्राम आहे असे मांडले. 

3 सावरकरांच्या “सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते”, “तानाजीचा पोवाडा” या कविता लोकप्रिय आहेत. 

4 सावरकरांची काळपाणी ही कादंबरी अत्यंत लोकप्रिय आहे. 

5 ‘माझी जन्मठेप’, ‘शत्रूच्या शिबिरात’, ‘अथांग’ ही आत्मचरित्रपर पुस्तक आजही वाचकांच्या हृदयाचा ठोका चुकवतात. 

6 कमला, गोमंतक, विरहोच्छवास, सप्तर्षी ही महाकाव्ये आणि चाफेकरांचा फटका हे स्फुट काव्य आजही वाचकांची पसंती आहे. 

स्वातंत्र्यवीर सावरकर फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले नाहीत. तर ते समाजातील जुने विचार आणि चाली रीती विरुद्ध सुद्धा लढले. खरंच ते विचारांनी देखील स्वतंत्र होते. याचा अनुभव त्यांच्या मृत्यूपात्रातून येतो. 

‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.

खरंच स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतंत्र अशी विचारसरणी महत्वाची आणि अशी स्वतंत्र विचारसारणी एका साहित्यकारा शिवाय कोणाकडे कशी असेल. शब्दातले ते जाळ ज्यांनी इंग्रजांचे भारताला अडकवण्यासाठी विणलेलं जाळं तोडलं आणि जे आजही धगधगत आहे त्यांची निर्मिती पुन्हा होणे नाही.   

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments