आपलं शहर

Lockdown Again : आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेल्या दोन गोष्टी, नाहीतरी लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय

मुंबईसह राज्यातील अनेक भागात कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू झाला आहे. राज्यात पुनश्च हरी ओम करत अनेक गोष्टी सुरू करण्यात आल्या, मात्र या सगळ्यात कोरोना रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे.

वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील सावधानतेचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आरोग्यमंत्र्यांच्या बैठकीत दोन गोष्टी ठरवल्या असल्याचे सांगितले आहे.

प्रत्येक जिल्ह्यांमध्ये स्थानिक अधिकाऱ्यांना, जिल्हाधिकाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत, नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करायच्या सुचनादेखील राज्य सरकारकडून देण्यात आल्या आहेत.

नियम लागू करण्याचे आणि कारवाईचे पूर्ण आदेश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. नागरिकांकडून नियमांचं पालन होत नसेल, तर पुन्हा लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय असेल, असे मतही राजेश टोपे यांनी मांडले आहे, त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास अनेक भागातील निर्बंध कडक होण्याची शक्यताही राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.

मुंबई लोकलबद्दल निर्णय
मला वाटत नाही लोकलबद्दल सर्वसामान्यांना अजून सूट दिली पाहिजे, पूर्ण वेळ सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासाठी अजून काही वेळ वाट पाहावी लागेल. याबद्दल मुख्यमंत्री यांच्याशी बोलणे सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई लोकलबद्दल लागू केलेले धोरण योग्य आहे, आपल्या सगळ्यांना अजून वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागेल, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडले आहे.

कार्यक्रमांवर निर्बंध

लॉकडाऊन हटवल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मिरवणुका, कार्यक्रम होण्यास सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमांवर जरी निर्बंध असले तरी ते नियम पाळण्यास लोक तयार नाहीत. अनेक कार्यक्रमांमध्ये, लग्न समारंभामध्ये नागरिकांची अफाट गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोना वाढण्यास सुरुवात होत असल्याचे, राजेश टोपे यांनी म्हटलं आहे, त्यामुळे स्थानिक जिल्हाधिकारी, अधीकाऱ्यांवर अशा कार्यक्रमांवर कारवाई करण्याचे आदेश राजेश टोपे यांनी दिले आहेत. (Lockdown Again: Two things said by the Health Minister, otherwise lockdown is the last resort)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments