आपलं शहर

2 दिवसांमध्ये सर्वात जास्त व्हायरल झालेला एकमेव फोटो…

‘ये है बॉम्बे मेरी जान’ : मुंबईच्या लोकलमध्ये 11 महिन्यांनंतर चढताना अनेकांचा आनंद गगणात मावत नव्हता. अशाच एका व्यक्तीने पाया पडून लोकलची पायरी चढली आहे.

एका व्यक्तीचा मुंबई लोकलसमोर डोकं टेकवतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जवळपास 11 महिन्यांनंतर मुंबई लोकल ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी प्रवासीने पाया पडलेला फोटो व्हायरल होत आहे. गेल्यावर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर रेल्वेने सर्वांसाठी लोकल बंद केली. मात्र 11 महिन्यांनंतर सर्वांसाठी मुंबईतील लोकलचा प्रवास करण्याची परवानगी दिली.

शहराची लाईफलाईन पुन्हा रुळावर आली तेव्हा या फोटोने सर्वसामान्यांनी सुखाचा श्वास घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरील हा फोटो असल्याचं स्पष्ट होत आहे. मुंबई लोकल शहराची लाईफलाईन का आहे, या भावनेचे चित्र या चित्रातून स्पष्ट होत आहे.

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामवर सगळीकडे या फोटोने धूम माजवली आहे. ट्विटरवर 20,000 हजार लाइक्स आणि 2000च्या वर रिट्विटस् आहेत.

एका युजरने लिहिले “या शहराचे सार आणि आपल्या सर्वांचे संगोपन.” आणखी एकाने लिहिले, “फक्त एका खऱ्या मुंबईकरलाच त्याचे महत्त्व समजेल”

तिसऱ्या युजरने लिहिले आहे की ” लाखो लोकांसाठी मुंबईची लोकल रोजच्या आयुष्यातली गरज आहे. जो कोणी मुंबईत राहतो त्याला हे माहित असेलच.” अजून एका ने लिहिले ” आमची मुंबई एका फोटोमध्ये सामावली”

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments