कारण

शरजीलसारखे कित्येक किडे-मकोडे आले आणि गेले…निश्चिंत राहा, शर्जीलला बेड्या पडतीलच – संजय राऊत

पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर त्यावर विविध माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

यावर सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी टीका केली आहे. शरजील सारखे कित्येक किडे-मकोडे आले व गेले. महाराष्ट्रात हिंदुत्वाचे एक पानही त्यांना खुडता आले नाही. समस्त हिंदू समाजाला अपमानित करणे हे निधर्मीपणाचे धंदे म्हणजे समाजाला लागलेला कलंक आहे. शरजीलसारखे साप अलिगढच्या बिळातच काय, तर पाताळात लपून बसले तरी त्याला खेचून आणण्याची हिंमत महाराष्ट्र पोलिसांत आहे. हे काय श्री. फडणवीस यांना माहीत नाही? तेसुद्धा कालपर्यंत राज्यकर्ते होतेच. त्यांच्या मनात तरी महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेविषयी शंका असू नये. शरजीला बेड्या पडतीलच. निश्चित रहा! ठाकरे राज्यात हिंदूच काय, समाजातला प्रत्येक घटक सुरक्षित आहे. पण रस्त्यावर तीन महिन्यांपासून लढणाऱ्या हिंदू शेतकऱ्यांना तेवढा आधार द्या म्हणजे झाले! अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

आमचं आव्हान आहे योगी सरकारला ही तुमच्याकडची घाण आहे…महाराष्ट्राचे पोलीस त्यांना पकडतील पण तुमचं सहकार्य आवश्यक आहे. अशी प्रतिक्रिया देखील संजय राऊत यांनी दिली.

(Many insects like Sharjeel came and went … Rest assured, Sharjeel will be handcuffed – Sanjay Raut)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments