खूप काहीफेमस

रिक्षावाल्याची मुलगी ठरली “मिस इंडिया 2020” रनर-अप; असा आहे तिचा प्रवास

असे म्हणतात की जर आपण मन लावून, अथक परीश्रम करून एखादे काम केले तर त्या मेहनतीचे फळ आपल्याला नक्कीच मिळते. अशी कितीतरी उदाहरणे आपल्यापुढ्यात आहेत, त्यातील एक ताजं उदाहरण म्हणजे नुकतीच VLCC Femina Miss India 2020 या स्पर्धेची रनर अप ठरलेली मान्या सिंह (Manya Singh). हा मान मिळविण्याचा तिचा प्रवास अतिशय संघर्षाचा होता. उत्तरप्रदेशमधील कुशीनगर येथे वाढलेल्या मान्याचे वडिल हे एक रिक्षाचालक आहेत.

“मिस इंडिया 2020” रनर-अप झाल्यानंतर मान्या आता तिच्या या प्रवासाचा उपयोग इतरांना प्रेरणा देण्यासाठी करत आहे. एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून मान्याने आपली संपूर्ण कहाणी सांगितली आहे.

स्वप्न पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रम
मान्या तिच्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरी जात इथवर पोहोचली आहे. आपला प्रवास सांगताना मान्या म्हणते, “मी काहीही न खाता, न झोपता अशा असंख्य रात्री काढल्या आहेत. रिक्षाचालकाची मुलगी असल्यामुळे मला तरूण वयात काम करायला लागले त्यामुळे कधीच शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही. परंतू माझ्या पालकांनी माझ्या आईचे दागिने विकून माझ्या डिग्रीच्या परिक्षेची फी भरली.”

वयाच्या चौदाव्या वर्षी मान्याने आपल्या घरातून पळून जाऊन कशीतरी आपली शाळा पूर्ण केली. त्या काळात मान्या सकाळी आपला अभ्यास करायची, संध्याकाळी भांडी घासायची आणि रात्री एका कॉल सेंटरवर काम करायची. दहावी बोर्डाच्या परिक्षेच्यावेळी मान्या एका पिझ्झा चेन मध्ये काम करायची आणि विशेष म्हणजे तिने दहावीच्या परिक्षेत 80% मिळवले.

एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मान्या आपल्याला मिळालेल्या बक्षीसरूपी रकमेचा वापर आपल्या कुटुंबाच्या मदतीसाठी करणार आहे. शिवाय, तिला एक मॉडलींगचे काम चालू ठेवायचे आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments