खूप काही

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या मिया खलीफाची इतकी आहे संपत्ती..

मिया खलीफा (Mia Khalifa) ने 2020 च्या सुरूवातीलाच टिकटॉकवर आपलं अकाऊंट तयार केलं, आणि काही आठवड्यातच तीचे फॉलोअर्स कोटींच्या घरात पोहोचले. सध्या तिचे 7.8 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि 51.9 मिलियन लाईक्स आहेत. मिया खलिफा सोशल मिडियावर खूप प्रायव्हेट असते. कालपरवाच तिने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या ट्विटमुळे ते आचानक चर्चेचा विषय बनली आहे.

मिया खलीफाने या आंदोलनाच्या समर्थनार्थ आधी इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली ज्यामध्ये एक आंदोलकाने पोस्टर हातात घेतले आहे. यामध्ये असं लिहिले आहे की, “शेतकऱ्यांना मारणं बंद करा. दिल्लीमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हे काय चालू आहे.” यानंतर मियाने एक ट्विट करत शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

मात्र आम्ही आज तुम्हाला मिया खलीफा हीच्या संपत्ती, व्यवसाय, राहणीमान विषयी काही गोष्टी सांगणार आहोत.

मिया खलीफाची एकूण संपत्ती आहे 29 कोटी रुपये
मिया खलीफाने बारटेंडर आणि एक पार्ट-टाईम मॉडेल म्हणून काम करत आपल्या मॉडेलिंग करीयरला सुरूवात केली. सध्या ती एक लोकप्रिय सोशल मिडिया सेलेब्रिटी आहे (इंस्टाग्रामच्या भाषेत बोलायचं तर “Influencer” आहे). काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार तीची सध्याची एकूण संपत्ती जवळपास 29 कोटी रुपये इतकी आहे.

त्यासोबतच मिया खलिफाला कारची देखील आवड आहे. तिने आपल्या गॅरेजमध्ये एकाहून एक जबरदस्त गाड्याचं कलेक्शन केलं आहे. त्यामध्ये BMW I8 Coupe, Audi R8 Spyder, यांसारख्या महागड्या गाड्यांचा समावेश आहे. तसेच ती टेक्सासमध्ये एका अतिशय सुंदर आणि महागड्या घराची मालकीण आहे.

मियाचा स्वत:चा प्रोडक्ट आहे
मिया खलिफाचा “Mia K” नावाचा एक ब्रँड आहे. हा एक कपड्यांचा ब्रँड आहे. त्याशिवाय ती वेगवेगळे प्रोडक्टस आपल्या चाहत्यांमध्ये प्रमोट करते आणि त्यांना ते खरेदी करण्याचे आवाहन देखील करते. याशिवाय मियाचं स्वत:चं कॅलेंडर देखील आहे. तेही ती सोशल मिडियावर प्रमोट करुन विकत असते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments