आपलं शहरखूप काही

फेसबूकची मैत्री पडली महागात, कोरोडोंचा लागला गंडा…

मुंबई: फेसबुकवरून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात फसवून कस्टम ड्युटी फ्रौड करणाऱ्या एका विदेशी नागरिकाला आणि एका महिलेला बोरिवली पोलिसांनी पकडलं आहे. दोघांनी बोरिवली पश्चिम मध्ये राहणाऱ्या महिलेला 10.5 लाख रुपयांना फसवलं आहे. 

तक्रार केल्यानंतर बोरिवली पोलिसांनी दिल्लीच्या चंद्र विहार पासून ट्रॅप लाऊन विदेशी नागरिक इफिनाई मदुकासी प्रिंस (30) आणि नॉर्थ इंडियन महिला हेयो बोलो मेइंग (23) ह्यांना अटक केली आहे.या दोघिंजवळून 16 डेबिट कार्ड, 10 पासबुक, 9 लॅपटॉप, 9 मोबाईल, 4 नवीन सिम कार्ड, 2 इंटरनॅशनल सिम कार्ड जप्त केले आहे.

इफिनाई मदुकासी प्रिंस महिलांना 10 खोट्या फेसबुक अकाऊंट वरुण फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायचा आणि त्यांचा व्हॉट्सऍप नंबर घेऊन त्यांच्याशी बोलायचा. जेव्हा महिला पूर्णपणे प्रेमाच्या जाळ्यात अडकायच्या लंडन वरुण गिफ्ट येण्याची बोलणी व्हायची. गिफ्ट पाठवल्याच्या 2-3 दिवसानंतर एअरपोर्टवरून खोटी कस्टम महिला हेयो बोलो मेइंग त्यांच्याशी सुनीता शर्मा बनून बोलयची.

महिलांना त्यांचे पार्सल सोडवण्यासाठी कस्टम ड्युटी फिस भरायला सांगायची आणि कोणी पैसे भरायला मनाई केली तर विदेशी नागरिक परत फोन करून त्यांना बॅगच्या आतमध्ये 3-4 करोडचे दागिने आहेत आणि मी आल्यानंतर ते दागिने तुमच्याकडे ठेवा अस बोलून त्यांची फसवणूक करायचा.त्यानंतर महिलांना जोपर्यंत माहित पडायच तोपर्यंत फेसबुक अकाऊंट आणि फोन नंबर बंद व्हायचे. 

या प्रकरणातील सगळ्या दोषींना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments