कारण

‘राज’पुत्राच्या हाती BMC ची रणनिती, अमित ठाकरेंवर मोठी जबाबदारी…

कल्याण, डोंबिवलीमध्ये मनसेला खिंडार पडल्यानंतर मनसेने सावधगिरीची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. ‘राज’पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडे मनसेच्या पक्ष बांधणीची जबाबदारी देण्यात आली आहे, सोबतच मुंबई पालिका (Mumbai Corporation) निवडणुकीची जबाबदारीही त्यांच्याकडे सोपवण्यात आली. यामुळे येत्या काळात मनसे एका नव्या ढंगात दिसेल, असेही म्हटले जात आहे. (MNS leader Amit Thackeray is responsible for the Mumbai Municipal Corporation elections)

मनसेच्या पक्ष फूटीच्या घटनेनंतर अमित ठाकरेंकडे पक्ष संघटन बांधणीची जबाबदारी देण्यात आलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या उपस्थित कृष्णकुंज’वर झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. मुबईतील लोकसभा निहाय 1 नेता, 1 सरचिटणीस यांची एक कमिटी बनवली आहे. यानुसार उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदार संघाची जबाबदारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना आता मनसेने कंबर कसलेली पाहायला मिळत आहे. स्वबळावर मुंबई पालिकेची निवडणूक लढवायची आणि पालिकेवर मनसेचा ध्वज फडकवण्याचा असा निर्धार मनसेने केल्याचं यातून स्पष्ट दिसत आहे.

मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण, डोंबिवली या पालिकांच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळे मनसे नेते अमित ठाकरे यांचा झांझावात पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments