आपलं शहरकारण

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसेचा मास्टर प्लॅन; कृष्णकुंजवर पार पडली बैठक

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेच्या दोन नेत्यांनी मनसेला रामराम ठोकला. यामुळे मनसेचे इंजिन पुन्हा एकदा रुळावरून घसरले आहे. याच पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी कृष्णकुंजवर मनसेच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.

आगामी निवडणुकांचा मास्टर प्लॅन या बैठकीत तयार करण्यात आला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी पक्षातील नेते आणि सरचिटणीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मुंबई पालिका निवडनिकीसाठी लोकसभानिहाय एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार करण्यात आली आहे. ही कमिटी लोकसभेत जाऊन आढावा घेणार आहे. आणि त्याचा अहवाल 25 फेब्रुवारी पर्यत राज ठाकरे यांना देण्यात येणार आहे.

मुंबईबाहेरही ठाणे, पुणे, नाशिक, कल्याण डोंबिवली यासाठी एक नेता आणि एक सरचिटणीस यांची कमिटी तयार केली जाणार आहे.

अशी असेल लोकसभा मतदारसंघनिहाय मनसेची समिती
1- उत्तर मुंबई
बाळा नांदगावकर – नेते, मनसे
संजय नाईक – सरचिटणीस, मनसे

2 – उत्तर मध्य
संजय चित्रे – नेते, मनसे
राजा चौगुले – सरचिटणीस, मनसे

3 – उत्तर पश्चिम
शिरीष सावंत – नेते, मनसे
आदित्य शिरोडकर – सरचिटणीस, मनसे

4 – दक्षिण मध्य
अविनाश अभ्यंकर – नेते, मनसे
नयन कदम – सरचिटणीस, मनसे

5 – दक्षिण मुंबई
नितीन सरदेसाई – नेते, मनसे
मनोज चव्हाण – सरचिटणीस, मनसे

6 – उत्तर पूर्व
अमित ठाकरे – नेते, मनसे
संदीप देशपांडे – सरचिटणीस, मनसे

(MNS master plan for upcoming Mumbai Municipal Corporation elections; The meeting was held at Krushnakunj)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments