कारण

ना सेवक, ना आमदार, तरीही मनसेचा हुकमी एक्का शिवसेनेत…

अनेक पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यात प्रत्येक पक्षाने आपली जागा बळकट करण्यास मैदानात उतरला आहे. त्यामुळे अनेकांचे पक्षांतर सुरू झाले आहे. (MNS office bearers joined Shiv Sena, Rajesh Kadam from Dombivali joined Shiv Sena)

शिवसेनेने कल्याण डोंबिवली महापालिका बळकट करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत अनेक मनसैनिकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

डोंबिवलीतील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम (MNS Rajesh Kadam) यांच्यासह अनेक  कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला आहे.

डोंबिवलीतील राजेश कदम यांचा आतापर्यंत कुठलाच बडा राजकीय इतिहास नाही. आमदार नगरसेवक पदही कधी न भूषवलेल्या कदमांचा प्रवेश थेट मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षावर झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राजेश कदम यांचा पक्षप्रवेश झाल्याने कल्याण डोंबिवलीत त्यांची किती ताकद असू शकते आणि याचा मनसेला किती मोठा धक्का बसू शकतो, याचा अंदाज काढता येईल.

राजेश कदम यांच्यासोबत दीपक भोसले, सागर जेढे, कल्याण ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.

कोण आहेत राजेश कदम
डोंबिवलीत मनसेची भूमिका चोख पार पडणारे, मनसेला मोठं करणारे आणि प्रत्येक राजकीय नेत्याला, सत्ताधार्यांना धारेवर धरणारे म्हणून राजेश कदमांची ओळख आहे.

मनसेचे संस्थापक सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष, डोंबिवली शहराध्यक्ष अशीही राजेश कदमांची ओळख आहे. 2009, 2015 मध्ये राजेश कदम यांनी महापालिका निवडणुकीत आपलं नशीब अजमावल होत. मात्र दोन्हीवेळेस त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

राजेश कदम यांच्यासोबत ज्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेची वाट धरले, ते सर्व मनसेचे कट्टर कार्यकरते समजे जायचे. मनसेच्या सुरुवातीपासून त्यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांना साथ दिली आहे.

एकनाथ शिंदेंना यश

डोंबिवलीचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Dombivali Guardian Minister and Urban Development Minister Eknath Shinde) यांनी ही राजकीय खेळी केल्याचे म्हटले जाते. राजेश कदम यांच्या प्रवोशामागे एकनाथ शिंदे यांनी मोठी भूमिका बजावल्याचेही स्पष्ट म्हटले जात आहे, त्यामुळे येत्या काळात शिवसेनेला भक्कम करण्यासाठी शिवसैनिकांनी विडा उचलल्याचे म्हणायला हरकत नाही.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments