आपलं शहरखूप काही

हात उगारायची वेळ आणू नका… इंधन दरवाढीवरुण मनसेचा इशारा…

इंधन दरवाढीमुळे सामान्य माणसाची हालत वाईट झाली आहे. कल्याणमध्ये इंधन दरवाढीच्या बाबतीत मनसेकडून आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढ कमी करा, आता हात जोडून सांगतो हात उगारायची वेळ आणू नका असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे.

कल्याण मध्ये डोंबिवली शहराधक्ष्य मनोज घरत यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन करण्यात आल त्यात प्रकाश भोईर, कौसतुभ देसाई, दीपिका पेडणेकर, उर्मिला तांबे आदी सहभागी झाले होते.

कल्याणचे तहसीलदार दीपक आकडे यांना मनसेच्या शिष्टमंडळाच्या वतीने दरवाढ करण्याच्या कारणाने निवेदन सादर करण्यात आलं आहे. पेट्रोलच्या दराणे शंभरी गाठली आहे. घरगुती गॅसचे दरही वाढले आहेत. इंधनचे दर वाढले की बाकी सगळ्या मालवाहतुकीचेही दर वाढतात.

सरकारी तिजोरी भरण्यासाठी केलेली ही दरवाढ आहे जी अयोग्य आहे. फक्त इंधनच नाही तर वीज बिलसुध्दा अव्वाच्यासव्वा वाढल आहे. वीज बिल कमी करण्याचे आश्वासन देत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनाबद्दल घुमजाव केले आहे ज्याकडे मनसेचे लक्ष वेधले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments