खूप काही

#modi_girlfriend_do पासून #modi_boyfriend_do का होत आहेत हे ट्रेंड व्हायरल…

कोरोना मुळे अनेक उद्योग-धंदे बंद झाले, अनेकांच्या हातच्या नोकऱ्या गेल्या तर काहींसाठीच्या तर भविष्यातील संधींच्या वाटा सुद्धा बंद झाल्या. याचाच राग म्हणून तरुण नेटकरी मंडळींनी एक वेगळी शक्कल लढवत ट्विटरवर #modi_rojgaar_do असा हॅशटॅग ट्रेंड सुरु केला.अनेकांनी विविध मिम्स ट्विट करून या अत्याधुनिक चळवळीला पाठिंबा दिला. परंतु काही खोडसाळ नेटकरी मंडळींनी यापुढची झेप घेऊन चक्क #modi_girlfriend_do,#modi_boyfriend_do  योजना सुरु करण्याची मागणी केली आहे. (Modi government getting trolled on twitter by users)

#modi_rojgaar_do हा हॅशटॅग रविवार पासूनच ट्रेण्डला होता. देशात वाढत्या बेरोजगारीला चापट बसावी आणि यावर लवकरात लवकर मार्ग निघावा यासाठी हा ट्रेंड सुरु झाला.

पण काही कळताच या ट्रेंडने वेगळ रूप घेतलं बेरोजगारीमुळे आलेल्या पैश्यांच्या अडचणी मुळे प्रियकर-प्रियसीचे खर्च उचलता येत नसल्याने #modi_girlfriend_do, #modi_boyfriend_do’ असा ट्रेंड सुरु करून तरुण नेटकऱ्यांनी सरकारला चांगलीच कोपरखळी मारली आहे. हजारोंच्या संख्येने नेटकऱ्यांनी हे हॅशटॅग वापरून ट्विट केले आहेत.

एवढच कमी होत की काय म्हणून काहींनी तर ‘#मोदी_मतलब_देश_चोपट’ असा नवीन हॅशटॅग सुरु केला आहे. यावर सुद्धा अनेक मिम्स ट्विट करण्यात आले आहेत. मोदी सरकारवरचा हा ट्विट हल्ला किती काळ जोर धरणार आणि किती रूप बदलणार हे सांगता येत नाही परंतु देशातील तरुण पिढी जागी होत असून स्वतःच्या हक्कांसाठी अत्याधुनिक चळवळ सुरु करताना दिसत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments