खूप काही

MP: सिधी बस अपघातात 50 जणांचा बळी, बस सोडून चालक फरार

मध्य प्रदेशच्या सिधी जिल्ह्याच्या रामपुर नैकिन थाना क्षेत्रामध्ये प्रवाशांनी गच्च भरलेली बस पुलावरून कालव्यात पडली. पाण्यात पडून आत्तापर्यंत 50 लोकांचा बळी गेला आहे ज्यात 21 स्त्रियांचा समावेश आहे. बसमध्ये 54 प्रवाशी होते आणि त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश होता. 30-35 विद्यार्थी होते जे एएनएमची परीक्षा द्याल्या चालले होते.

अपघातात सुरक्षित वाचलेल्या एएनएमची परीक्षा द्यायला चाललेल्या विभा प्रजापती ने सांगितले की ” जेव्हा बस कालव्यात पडली आणि त्यात पाणी भरायला सुरुवात झाली तेव्हा लोकांनी बसच्या खिडक्यांच्या काचा फोडण्याचा प्रयत्न केला पण ते असफल झाले.”

प्रवासिने सांगितले की अपघाताच्या वेळी बस खूप वेगाने चालत होती आणि बस पाण्यात पडण्याच्या आधी बस चालक बस मधून उडी मारून निघून गेला.उडी मारताना त्याने सगळ्यांना आपले प्राण वाच वायला सांगितले.

प्रजापतीने सांगितले की बस एकदम गच्च भरली होती, 15-20 लोक उभे होते. दोन लोकांच्या सीटवर 3 जण बसले होते.बस मध्ये 54 प्रवाशी होते. काही लोक चुरहट मध्ये उतरले कारण त्यांना बसायला जागा नव्हती.चुरहट सिधी आणि सतनाच्या मध्ये स्थित आहे.

शिवरानी लोनिया जिने हा अपघात प्रत्यक्ष बघितला तिज म्हणण आहे की बस रस्त्यावरून घसरून पाण्यात पडली.जेव्हा हा अपघात झाला तेव्हा मी आणि माझा भाऊ कालव्याजवळ उभे होतो. मी आणि माझ्या भावाने लगेच पाण्यात उडी मारली आणि दोन लोकांना वाचवल.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments