आपलं शहर

मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर; जाणून घ्या शिक्षण विभागासाठी कोणत्या तरतुदी आहेत

आशियातील सर्वात मोठ्या मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प मनपा आयुक्त मनपा आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी 2945 कोटींचे बजेट जाहीर करण्यात आले.

जाणून घ्या शिक्षण विभागासाठी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत

 • शाळांमध्ये कोव्हिड 19 आरोग्य विषयक अत्यावश्यक साधनांचा पुरवठा 15 कोटी.
 • शाळांमध्ये आता सॅनिटायझर, साबण विद्यार्थ्यांना दिले जाणार.
 • मुंबई महापालिकेच्या शाळांचे नवीन नामांतरण होणार.
 • पालिकेच्या शाळा आता ‘मुंबई पब्लिक स्कूल’ नावाने ओळखल्या जाणार.
 • मुंबई महापालिकेच्या नवीन 24 माध्यमिक शाळा सुरू होणार.
 • मुंबई महापालिका दहा नवीन सीबीएसई शाळा सुरू करणार, यासाठी 2 कोटी तरतूद.
 • शहरात 2 , पश्चिम उपनगरात 3 , पूर्व उपनगरात 5 अशा 10 शाळा असणार,
  खासगी शाळांना 380 कोटी अनुदान.
 • शालेय वस्तूंचा मोफत पुरवठा करण्यात येणार, त्यासाठी 88 कोटींची तरतूद.
 • महापालिका शाळेतील 1300 वर्गखोल्या डिजीटल क्लासरुम होणार, त्यासाठी 28.58 कोटींची तरतूद.

(Mumbai Municipal Corporation budget presented; Find out what the provisions are for the Department of Education)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments