आपलं शहर

बीएमसीचा धमाका, 145 कॅफे अँड बार, तर 650 जणांना लावला दंड

राज्यासह मुंबईत कोरोना रुग्णांची पुन्हा वाढ होत असलेलं चित्र निर्माण झालं आहे, त्यामुळे प्रशासनाकडून सगळीकडे सावधानतेचा इशारा दिला जात आहे. त्यात मुंबई महानगरपालिकेनेही अलर्ट जारी केलाय. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर स्वत: रस्त्यावर उतरून नागरिकांना सतर्क करत आहेत. (BMC initiated action, fined 145 cafes and bars and fined 650 people)

मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी, बार अँड रेस्टॉरंट, हॉटेल्स, कॅफे यांच्यावर बीएमसीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी (20 फेब्रुवारी रोजी) मुंबईतल्या वांद्रे आणि खार परिसरातील 5 रेस्टॉरंट, पब आणि 145 कॅफे अँड बारमध्ये सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नसल्याने दंड आकारण्यात आला आहे.

शनिवारी केलेल्या कारवाईमध्ये 650 जणांकडून 1 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोना तसेच सोशल डिस्टंसिंगचे नियम न पाळल्यामुळे हा दंड लागू करण्यात आला असल्याचे बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

वांद्रे येथे असणाऱ्या 145 कॅफे अँड बारवर गुन्हादेखील नोंदवण्यात आला आहे. नियम मोडल्याने संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्याअंतर्गत वांद्रे पोलिसांमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 188, 269 कलमांअतर्गत एच वार्डच्या आरोग्य खात्याकडून हा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

रेस्टॉरंट, पब, मंगलकार्यालयांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळणं बंधनकारक असेल, हॉटेलमध्ये होणारी गर्दी टाळावी, त्याचबरोबर वाढत्या कोरोना रुग्णांना लक्षात घेऊन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आदेश बीएमसीकडून देण्यात आले आहेत.

ताकीद देऊनही कोरोनाच्या नियमांचं उल्लंघन केल्यास संबंधीत मालकावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मोठ्या कारवाईमध्ये हॉटेल, पब रेस्टॉरंट, मंगलकार्यालये किंवा इतर आस्थापनांना सील केलं जाईल, अशी माहिती बीएमसीकडून देण्यात आली आहे. (BMC initiated action, fined 145 cafes and bars and fined 650 people)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments