आपलं शहर

कोरोनानंतर मुंबईची नाईट लाईफ लवकरच पूर्व पदावर, आदित्य ठाकरेंची नवी माहिती

महाराष्ट्रात प्रयत्नांची पराकाष्ठा करत ठाकरे सरकार स्थापन झाले. शपथ विधी पूर्ण झाला आणि नंतर मंत्री मंडळ विस्तार पार पडला. यामध्ये महत्त्वाचे नाव आदित्य ठाकरे यांचे होते. त्यांचे पददेखील महत्वाचे मानले जात होते. (Mumbai’s nightlife soon after Corona’s re-emergence, new information from Aditya Thackeray)

आदित्य ठाकरे यांना पर्यावरण आणि पर्यटन हे पद मिळाल्यानंतर त्यांनी सुरवातीपासूनच निर्णय घेण्याचा सपाटा लावला होता. त्यापैकीच एक म्हणजे मुंबई नाईट लाईफ. मुंबईत नाईट लाईफ सुरू करणार म्हटल्यावर विरोधकांनी आदित्य ठाकरे आणि सरकारवर टोले लगावायला सुरवात केली, तरीही मुंबईत नाईट लाईफ सुरू झाली आणि अवघ्या दोन महिन्यात मुंबईची नाईट लाईफ कोरोनामुळे बंद झाली.

नाईट लाईफ जवळपास 11 महिने बंद असली तरी पुन्हा एकदा सुरू होण्याच्या मार्गावर आहे, असे संकेत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Environment and Tourism Minister Aditya Thackeray) यांनी दिले आहेत. कोरोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद झालेत, ते पुन्हा सुरू होण्याच्या मार्गावर आहेत.

कोरोनानंतर पुन्हा नाईट लाईफ सुरू करणार आहोत. मिशन बिगेन सुरू केल्यानंतर हळूहळू आम्ही सर्व बाबी सुरू केल्या आहेत. ज्यामध्ये अद्याप कोणतीही बाब बंद करण्याची वेळ आली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

फक्त नाईट लाईफच नाही, तर सरकार एमटीडीसी आणि इतर हॉटेल व्यावसायिक यांच्यासोबत पार्टनरशीप करणार आहेत. त्यातून उत्पन्नाचं साधन निर्माण करणार आहे. असंदेखील आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

मुंबईत विंटेज कार म्युझियम सुरू होणार असून हे म्युझियम वरळीमध्ये असेल असं सांगत मुंबई विद्यापीठाकडून राजाभाई टॉवरसाठी प्रस्ताव आल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे, त्यामुळे येत्या काळात मुंबईची जुनी चमक लवकर चमकायला लागेल, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments