कारण

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी नाना पटोले यांचं नाव आघाडीवर; जाणून घेऊया कसा होता नाना पटोले यांचा कार्यकाळ

काँगेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षशपदाचा आज (4 फेब्रुवारी) दुपारच्या सुमारास सह्यादी अतिथीगृहावर दाखल झाले. यानंतर नाना पटोले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. त्यानंतर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सुपूर्त केल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारलेले आवडत नाहीत, ते लगेच चिडतात, तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात भाजप सरकार अपयशी ठरत आहे. अशी जाहीरपणे टीका नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

जाणून घ्या कोण आहेत नाना पटोले
2014 ते 2017 या कालावधीत पटोले यांनी भाजपच्या तिकिटावर खासदारकी भूषवली. भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर नाना पटोले निवडून आले. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून नाना पटोले हे भाजपचे खासदार होते.

नाना पटोले यांनी 2019 मध्ये नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूर मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर साकोली मतडसरसंघातून परिणय फुके यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवली.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.

(Nana Patole is leading for the post of Maharashtra Congress State President; Let us know what was the tenure of Nana Patole)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments