आपलं शहर

नवी मुंबई पालिका कचऱ्यापासून चालविणार पालिकेच्या तसेच NMMT च्या गाड्या; पहा हा अनोखा प्रकल्प

कचऱ्यासारख्या गोष्टींसाठी 3 आर चा फंडा शाळेत आपण शिकलो होतो. आता यावर प्रत्यक्षात अनोखा प्रकल्प पाहणार आहोत. प्रदूषण आणि कचऱ्याच्या विल्हेवाटीच्या प्रश्नावर नवी मुंबई महापालिकेने तोडगा काढला असून आता त्यापासून बायोगॅस प्रकल्प सुरू करणार आहे. आणि मुख्य म्हणजे याच बायोगॅस प्रकल्पाचा वापर करून पालिका स्वतःच्या आणि एनएमएमटीच्या गाड्या चालविणार आहेत.

नवी मुंबई शहरात दिवसागणिक 700 मेट्रिक टन घनकचऱ्याची निर्मिती होते. यातून ओला कचरा वेगळा करून त्यावर बायोगॅस प्रकल्प आता नवी मुंबई महापालिका उभारणार आहे. नवी मुंबई शहरातील दक्षिण व उत्तर भागांत हा बायोगॅस प्रकल्प सुरू केला जाणार आहे. यात 150 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या बायोगॅस हा सीएनजी पालिकेची आणि एनएमएमटीच्या वाहनांसाठी वापरता येणार आहे. या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर एनएमएमटीच्या डिझेलवर चालणाऱ्या गाड्या या सीएनजी मध्ये परावर्तित केल्या जाणार आहे.

आता नवी मुंबईत 700 मेट्रिक पेक्षा जास्त घनकचरा निर्माण होतो. यामध्ये एपीएमसी मार्केट मधला फळ आणि भाज्यांचा ओला कचरा जास्त प्रमाणात असतो. त्याचबरोबर शहरात असलेल्या शेकडो उपाहारगृहे तसेच रेस्टॉरन्ट यांमधून मोठ्या प्रमाणात ओला कचरा तयार होत असून तो कचराभूमीवर जात आहे. तसेच, नवी मुंबई शहराचा स्वच्छतेच्या बाबतीत देशात तिसरा तर राज्यात पहिला क्रमांक आहे. शहरातील नागरिक देखील याला साथ देत ओला व सुका कचरा वेगवेगळा करतात.

याचा उपयोग पालिकेचे बायोगॅस प्रकल्प उभारण्यासाठी केला जाणार असून पालिकेने तसे प्रस्ताव तयार केले आहेत. 700 मेट्रिक टनामध्ये 150 टन कचरा बायोगॅस प्रकल्पासाठी उपयोगात येणार असल्याने शहरातील दोन परिमंडळ कक्षात हे प्रकल्प सुरू केले जाणार आहेत. या प्रकल्पातील बायोगॅसचा वापर महापालिका स्वत:च्या वाहनांसाठी तसेच एनएमएमटीच्या 400 वाहनांसाठी करणार आहे. त्यासाठी डिझेलच्या जुन्या इंजिनाचे परिवर्तन गॅस इंजिनमध्ये केले जाणार आहे. त्यामुळे पालिका तयार करत असलेल्या गॅसचा जास्तीत जास्त वापर हा पालिकेच्या वाहनांच्या कामी येणार आहे.

नवी मुंबई शहरातील प्रदूषणाबाबत प्रदूषण कमी करण्यासाठी विद्युत वा वायू यावर आधारित वाहनांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने याआधीच दिले होते. त्यामुळे शहरातील प्रदूषण कमी करण्याचा हा सुखर असा मार्ग पालिका अवलंबनार आहे.

यावर नवी मुंबई पालिका आयुक्त अभिजित बांगर सांगतात, नवी मुंबईत भल्या मोठ्या प्रमाणात घनकचरा निर्माण होत असतो. यातील 150 टन ओल्या कचऱ्यावर सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. हॉटेलच्या कचऱ्यात जास्त प्रमाणात इंधनाला लागणारे आवश्यक फॅट असल्याने गॅस प्रकल्पावर भर दिला जात आहे. आता या इंधनाचा वापर हा एनएमएमटीच्या वाहनांसाठीही होऊ शकतो.

(Navi Mumbai Municipal Corporation will run municipal and NMMT vehicles from waste; Check out this unique project)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments