कारण

दीपसिंहला बंद खोलीत शेतकरी बनवलं आणि आंदोलनात सोडलं, मविआ भडकली

7 फेब्रुवारी रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) कोकण दौऱ्यावर होते. नारायण राणे (Narayan Rane) यांनी उभे केलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलच्या (Lifetime Hospital) उद्घाटनासाठी ते इथे आले होते, यावेळी भाषणात बोलताना त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. (Nawab Malik’s reply to Amit Shah’s statement)

अमित शाहांनी केलेल्या विधानावर महिआचे अनेक नेते आता बोलू लागले आहेत. राज्यातील अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनीदेखील अमित शाहांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. 26 जानेवारी रोजी झालेल्या दिल्लीतील हिंसाचारामागे भाजपचा हात असल्याचंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

देश आणि राज्य पातळीवरील भाजपची कार्यपद्धती फुग्यासारखी आहे. एकदा हवा गेली की पूढे जात नाही. महाराष्ट्रात भाजपचा फुगा फूटला, दिल्लीतील फुगाही लवकर फुटणार आहे. महाराष्ट्रातील सरकार भक्कम आहे. विधान सभेत आणि ग्रामपंचायतीतही मविआने भाजपला चोख उत्तर दिलंय.

अमित शाहांनी केलेल्या बंद खोलीतील वक्तव्यावरदेखील नवाब मलिकांनी उत्तर दिलं आहे. भाजपचं कामच बंद खोलीतले आहे. दीपसिंह सुद्धूला बंद खोलीत शेतकरी बनवलं आणि आंदोलनात घूसवलं. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला भाजपने बदनाम केलं, आंदोलनात कटकारस्थाने केली. त्यामुळे बंद खोलीतील नेत्यांनी बंद खोलीबद्दल बोलू नये. अशी टीकाही नवाब मलिकांनी केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments