आपलं शहर

लग्नाच्या मांडवात जाण्याऐवजी नवरदेव पोहोचला थेट एनसीबीच्या कार्यालयात…

मुंबईमध्ये गेले काही महिने एनसीबी (NCB) ने ड्रग्स व्यापाऱ्यांना पळता भुई थोडी केली आहे. दरदिवशी एक तरी ड्रग्स तस्करी करणारा व्यापारी एनसीबीच्या जाळ्यात सापडतोच आहे. असाच एक व्यापारी एनसीबीला सापडला आहे. बरं या व्यापाऱ्याची अटकही थोडी वाईटंच म्हणावी लागेल, कारण जेव्हा या महाशयांना अटक करण्यात आली तेव्हा त्याचे लग्न चालू होते! आता बोला.. (NCB arrest drug trader in Mumbai from his marriage ceremony)

बबलू पटरी नावाच्या एका आरोपीच्या चौकशीत या नवरदेवांचे नाव समोर आले आहे. या नवरदेवाला एनसीबीने त्याच्या लग्न मंडपातूनच अटक केली आहे. त्यामुळे मांडवात लग्न होण्याच्या खुशीत असलेल्या या नवरदेवाला एनसीबीने चांगलाच आहेर दिला आहे.

दरम्यान, 8 फेब्रुवारी रोजी कुर्ला येथे केलेल्या कारवाईत बबलू पटरी नावाच्या मोठ्या ड्रग्स सप्लायरला एनसीबीने अटक केली होती. या कारवाईमध्ये एनसीबीला 450 ग्राम गांजा, 56 ग्राम एमडी इत्यादी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. याच बबलू पटरीच्या चौकशीदरम्यान एनसीबीला या ड्रग्स सप्लायरचे नाव कळाले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments