खूप काहीआपलं शहर

नीरव मोदीची वाट पाहतोय आर्थर रोड जेल

पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी, भारतातील नामांकित हीरा व्यापारी नीरव मोदी यांना भारतात परत आणण्यासाठी ब्रिटिश कोर्टाने परवानगी देताच मुंबई आर्थर रोड जेल ने चांगलीच तयारी सुरु केली आहे. नीरव मोदींसाठी एक विशेष कोठडी सज्ज करण्यात आली आहे. 

नीरव मोदींना मुंबई मधील आर्थर रोड जेल मध्ये अधिक सुरक्षा असणाऱ्या बैरेक नंबर बारा मधील तीन कोठड्यांपैकी कोणत्याही एका कोठडीत ठेवण्यात येणार आहे. गुरुवारी ब्रिटन मधील एका न्यायाधीशांनी नीरव मोदी विरुद्ध भारतात चालू असलेल्या केस संदर्भांत नीरव मोदींनी भारतीय न्यायालयाला जबाब देणं बंधनकारक असल्याचा निर्णय सुनावला. 

ज्या कोठडीत नीरव मोदींची व्यवस्था केली जाणार आहे त्या कोठडीत कैदीयांची संख्या कमी राहील असे आश्वासन जेल विभागाकडून कोर्टला देण्यात आले आहे. या कोठडीत त्यांना गादी, उशी, बेडशीट आणि चादर दिली जाईल शिवाय या कोठडीत पुरेसा सूर्यप्रकाश, हवा खेळती राहील एवढी जागा  सोबतच खाजगी सामान ठेवण्यासाठी काही सुविधा ही पुरवल्या जातील. 

जेल मधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्या नुसार विजय मल्ल्या ला सुद्धा याच कोठडीत ठेवण्याबाबत चे पत्र राज्यसरकारने केंद्र सरकारला दिले होते. परंतु आजही मल्ल्या ब्रिटन मधेच लपून आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments