फेमस

‘झॉम्बी आले शहरात’… झोंबिवली ! मराठी चित्रपट सृष्टीतील पहिला वाहिला प्रयोग

झॉम्बी म्हंटल की आठवतात ते चित्रपटातील सडलेल्या शरीराचे, विद्रुप चेहऱ्याचे, माणसांना खाणारे जीव, हे जीव केवळ चित्रपटांचा भाग असले तरीही थरारक आणि भयपटांच्या चाहत्यांसाठी झॉम्बी हा विषय नेहमीच पसंदीचा राहिला आहे. हॉलिवूड आणि बॉलीवूड मध्ये झॉम्बीवर आधारित अनेक चित्रपट या आधी येऊन गेलेत प्रेक्षकांनीही या चित्रपटांना चांगलीच पसंती दिल्याचे दिसून येते. (New experiment in Marathi film industry Zombivali )

याच शैलीचा एक मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार  हे नाव मराठी चित्रपट सृष्टीत नवनवीन प्रयोग करण्यासाठी नावाजलेलं आहे. याआधी त्यांनी माउली, फास्टर फेणे, आणि कलासमेट्स अश्या दर्जेदार चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली आहे. आणि आता झॉम्बी वर आधारित मराठीतील पहिल्या चित्रपटांची निर्मिती ते करत आहेत. ‘झोंबिवली’ हे या चित्रपटाचे नाव असून ३० एप्रिल २०२१ ला हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहे. 

अमेय वाघ, वैदेही परशुरामी, ललित प्रभाकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाची घोषणा गेल्यावर्षी करण्यात आली तेव्हा पासूनच चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्साह दिसून आला. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा पहिला टीजर प्रदर्शित झाला त्यालाही प्रेक्षकांनी पसंती दर्शवली. मराठी चित्रपट सृष्टीतील हा वेगळा आणि पहिलाच प्रयोग असल्याने बऱ्याच गोष्टी या चित्रपटावर अवलंबून आहेत. मराठी चित्रपट सृष्टीचे नवनवीन प्रयोग जस जसे यशस्वी होत जातील तसतसे दर्जा ही वाढेल आणि प्रेक्षकांना सुद्धा नवनवीन कथानकांवर आधारित चित्रपटांची मेजवानी मिळेल.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments