आपलं शहर

Petrol-Diesel price today: पेट्रोल डिझेलच्या नव्या किंमती जाहीर…

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दरात झपाट्याने वाढ होत आहे. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरी गाठली आहे. गेल्या आठवड्यात पेट्रोलच्या किमतीत काही पटीने वाढ झाली.रोज 30 पैशांनी वाढ होत होती. मंगळवारी ही इंधन दरामध्ये वाढ झाली आणि बुधवारीही काही फारसे बदल झालेले नाहीत.

आज ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे.गुरुवारी राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ झाली तर डिझेलच्या किंमतीतही 35 पैशांची वाढ झाली.तेल कंपन्या दररोज इंधन दरात वाढ करतच असतात. दिल्लीत आज पेट्रोलची किंमत 90.93 वर पोहोचली आहे तर मुंबईत 97.93इतकी आहे.मेट्रो शहरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला आहे.

दररोज सकाळी 6 वाजल्यापासून इंधनाला नवीन किमती लागू होत असतात.परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज बदलत असतात.जर रोज बदलेले इंधन दर जाणून घ्यायचे असतील तर इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments