कारण

Budget 2021 :लाल साडी, बजेट सादर करताना सितारमण यांचा विशेष पेहराव

कोरोनामुळे डगमगलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेत बजेट सादर केले. घसरलेला विकास दर, मंदावलेली अर्थव्यवस्था याच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने यंदाचा हा नववा अर्थसंकल्प सादर केला.

मात्र, यावेळी अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी पेहराव केलेल्या लाल रंगाच्या साडीकडे सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. सीतारमण यांनी बजेट सादर करतेवेळी लाल आणि क्रीम रंगाची साडी नेसली होती. त्यावर सोन्याची चैन, बांगड्या, आणि कानातले दागिने असा सर्वसामान्यांसारखा त्यांचा लूक पाहायला मिळाला. या साध्या लूकनेही सर्वसामान्य जनतेचे लक्ष त्यांनी वेधून घेतले.

लाल रंग हा ऊर्जा, शक्ती, आणि प्रेम याचे प्रतीक मानला जातो. डगमगलेल्या अर्थव्यवस्थेला ऊर्जा देण्यासाठी त्यांनी या साडीची निवड केल्याचे म्हटले जाते.

(Nirmala sitharaman dons red saree for 2021-22 budget presentation)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments