कारण

नितीन गडकरींनी मोडलं सगळ्या नेत्यांचं रेकॉर्ड, रस्तेबांधणीच्या कामात अनेक विक्रम

सध्या भारतात रस्त्यांची सर्व कामे जलदगतीने सुरू आहेत. त्यातच भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्सप्रेस-वेचं काम करत असताना चार नव्या विक्रमांना गवसणी घातली आहे.

संबंधित एक्सप्रेस-वेचं काम करतेवेळी सर्वाधिक काँक्रीटचा वापर केला गेला आहे. तसेच हे काम फक्त 24 तासांमध्ये करत या महामार्गाने तब्बल चार वर्ल्ड रेकॉर्ड मोडले असल्याची माहिती यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरींनी ट्विट करत दिली आहे.

पूर्वीपेक्षा एका वेगवान राष्ट्रासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या आपल्या प्रयत्नात आम्ही फक्त नवीन मानके स्थापित करत नाही आहोत तर जागतिक विक्रम देखील मोडत आहोत, असे यावेळी गडकरींनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

या महामार्गाच्या बांधकामासाठी 24 तासांत Pavement Quality Concreteचा सर्वात जास्त वापर करण्यात आला आहे. तसेच 24 तासांमध्ये या कॉन्क्रीटचे सर्वाधिक उत्पादन झाले असल्याचं यावेळी गडकरींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान या कामगिरीमुळे सर्वांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments