कारण

Nitin Gadkari : प्रधानमंत्र्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं, गडकरिंचा video व्हायरल

मुबंई शेतकरी आंदोलनावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यसभेत विरोधकांवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण करताना देशात आंदोलनाच्या नावाखाली गोंधळ घालणाऱ्यांवर जोरदार टीका केली होती. मोदींनी आपण या पूर्वी श्रमजीवी, बुद्धिजीवी हे शब्द ऐकल्याचं म्हटलं होते. त्यानंतर आंदोलनजीवी नावाची जमात निर्माण झाली आहे. ही टोळी देशभरात सक्रिय असून या टोळीने उपद्रव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीका नरेंद्र मोदी केली. यानंतर राजकीय पक्षांसह सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया येत आहेत. नरेंद्र मोदींनी आंदोलनजीवी म्हणून डिवचल्यानंतर नितीन गडकरींचा व्हिडीओ व्हायरल होतं आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या व्हिडीओ सोबतच भाजप नेत्यांचे आंदोलनातील बरेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात येत आहेत.

पंतप्रधानांच्या या विधानावर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. मात्र त्याचसोबत आता सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून नेटीझन्स पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाची खिल्ली उडवत आहेत.

गडकरींच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये काय?
नितीन गडकरी यांचा काँग्रेस नेते डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय. त्यामध्ये नितीन गडकरींनी शांततापूर्ण आंदोलन करणं जनतेचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान जे बोलत आहेत ते लोकशाहीच्या विरोधात आहे. या देशात भ्रष्ट नेत्यांविरोधात, सरकारविरोधात आंदोलन करणं घटनेनं दिलेला अधिकार आहे. येथील जनतेचा अधिकार आहे. हा अधिकार काँग्रेस पक्ष किंवा पंतप्रधानांनी दिला नाही, तर संविधानाने दिला आहे. मूलभूत अधिकार, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, शांततेत लोकांनी आंदोलन करू नये हे पंतप्रधान कोणत्या आधारे बोलू शकतात का? याचं पंतप्रधानांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

(Nitin Gadkari old video viral in social media over PM Narendra Modi Statement of Andolanjivi)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments