कारण

पुढील 8 ते 10 दिवस लॉकडाऊन नाही; पण फक्त ‘हे’ बनू शकते लॉकडाऊनचे कारण – मुख्यमंत्री

सध्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा डोके वर काढत असून रुग्णसंख्येत देखील कमालीची वाढ पहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडत राज्यातील जनतेला थेट लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. लॉकडाऊन बाबत थेट मुख्यमंत्री यांनी जनतेला विचारणा केली आहे.

कोरोनाच्या या वाढत्या पार्श्वभूमीवर आता लॉकडाऊन होईल की नाही याबाबत सर्वांच्या मनात शंका होती. यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण दिल आहे. मुख्यमंत्री सांगतात, लॉकडाऊन करण्याचा निर्णय तुमच्यावर आहे. तुम्ही मास्क वापरत असाल, योग्य वेळी हाथ धुवत असाल आणि खबरदारीने अंतर पाळत असाल तर लॉकडाऊन टाळू शकता. तसेच, ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ” मी जबाबदार” या मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम न पाळणारेही मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवादाच्या माध्यमातून जनतेला सांगितले.

कोरोना परिस्थितीत आपल्याला जनतेशी लाईव्हच्या माध्यमातून संवाद करताना समाधान मिळते आणि आपण देखील मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता असे देखील मुख्यमंत्री आवर्जून म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments